💥पुर्णेतील तडीपार परिसरातील हत्या प्रकरणातील आरोपीस पोलिस पथकाने घेतले तेलंगणातील हैद्राबाद येथून ताब्यात....!


💥अवघ्या एका महिन्यापूर्वीच विवाह केलेल्या अरबाज खान पठाण या नराधमाने वादातून पत्नीस जिवे मारल्याचे तपासातून निष्पन्न💥 

परभणी (दि.२२ सप्टेंबर) : पूर्णा रेल्वेस्थानक क्रमांक चार जवळील तडीपार परिसरात रक्ताच्या थारोळ्या पडलेल्या अज्ञात महिलेच्या खून प्रकरणातील अज्ञात नराधम आरोपीची ओळख पटवण्यात जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना यांच्या यशस्वी मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिस दलाल यश आले असून परभणी जिल्हा पोलिस दलाच्या पथकाने त्या नराधम आरोपीस आज गुरुवार दि.२२ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळच्या सुमारास तेलंगणा राज्याची राजधानी हैद्राबाद येथून ताब्यात घेण्याची अत्यंत धाडसी व कौतुकास्पद कारवाई केली आहे.


         हैद्राबाद रहिवासी असलेल्या अरबाज खान पठाण वय २२ वर्षे याचे एका महिन्यापूर्वीच निर्घृण हत्या केलेल्या १९ वर्षीय तरुणीशी विवाह झाला होता पती-पत्नीच्या अंतर्गत कौटुंबिक वादातूनच त्याने स्वतःच्या पत्नीस पुर्णेतील रेल्वे स्थानक क्रमांक चार लगत असलेल्या तडीपार परिसरात सिमेंट विटां दगडाने ठेचून जीवे मारल्याचे तपासातून निष्पन्न झाले असून या घटने संदर्भात पुर्णा पोलीस स्थानकात गुरनं.२२२/२०२२ अंतर्गत भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील रेल्वेस्थानकाजवळील तडीपार परिसरातील झाडा झुडपात मंगळवार दि.२० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका  महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरासह संपूर्ण शहरात तसेच पोलिस दलातही मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेवून मृतदेह ताब्यात घेतला सस्कृतदर्शनी त्या महिलेचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केला असावा, असा अंदाज वर्तवित पोलिसांनी तातडीने  त्या महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला होता. ही महिला मुस्लिम समाजातील असावी, असे स्पष्ट झाले होते.  पोलिसांनी त्या महिलेची ओळख पटविण्यासह नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरु केला.  

जिल्ह्याचे अत्यंत कर्तव्यकठोर कर्तव्यतत्पर जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना यांनी तात्काळ पूर्णेत दाखल होऊन स्वतः घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पूर्णा पोलिसांनी रेल्वेस्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज तपासले तेव्हा सोमवारी मध्यरात्री पूर्णा रेल्वेस्थानकावरील ओव्हरब्रिज व प्लॅटफॉर्मवर त्या महिलेस एक तरुण जात असतांनाचे फुटेज प्राप्त झाले. पोलिसांनी त्या फुटेजच्या आधारे आरोपीचा चेहरा निष्पन्न केला असून त्याआधारे आता पूर्णा पोलिसांनी शोध घ्यावयास सुरुवात केली होती.

या घटनेचा तपास लावण्यात जिल्हा पोलिस दलाला अवघ्या दोन दिवसात यश आल्याने जिल्हा पोलिस दलासह जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक श्री.जयंत मिना यांचे सर्वत्र कौतुक होत आहे........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या