💥राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील सोमवार दि.१९ सप्टेंबर रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर...!


💥राष्ट्रवादी भवन येथे आ.जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या परभणी जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीची आढावा बैठक घेणार💥 

परभणी (दि.१६ सप्टेंबर) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंतराव पाटील सोमवार दि.१९ सप्टेंबर २०२२ रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत १९ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०६:३० वाजता परभणी येथे त्यांचे आगमन होणार असून परभणीतील राष्ट्रवादी भवन येथे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या परभणी जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीची आढावा बैठक घेणार आहेत.

यानंतर सोमवारी रात्री ०८:०० ते ०९:०० या वेळेत ते परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणीची आढावा घेतील. रात्री ०९:०० ते ०९:३० ही वेळ कार्यकर्त्यांसाठी राखीव ठेवण्यात आली असून रात्री ०९:३० वाजता ते परभणी हुन हिंगोली कडे प्रयाण करतील. या दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे, खासदार फौजिया खान, परभणी जिल्हा निरीक्षक बसवराज पाटील नागराळकर, प्रदेश सरचिटणीस माजी आमदार विजय गव्हाणे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार विजय भांबळे, माजी आमदार डॉ.मधुसूदन केंद्रे, माजी आमदार सितारामजी घनदाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, राष्ट्रवादीचे परभणी शहराध्यक्ष प्रताप देशमुख, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भावनाताई नखाते आदींची उपस्थिती राहणार आहे. या आढावा बैठकीला जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष,कार्यकारणी सदस्य,तालुकाध्यक्ष,आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या