💥ऑनलाइन ई-बुक्स आणि जनरल पाहण्यासाठी एन.लिस्ट च्या सुविधेचा वापर करा - ग्रंथपाल डॉ.दत्ताञय काळबांडे


💥विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक कार्यासाठी ई-बुक्सचा आपल्या अभ्यासपूर्ण वाटचालीस अधिक प्रभावी करण्यासाठी वापर करावा💥

         ज्ञानाचा सागर असणाऱ्या आजच्या जगात अभ्यासपूर्ण संशोधनासाठी ई-बुक्स आणि जनरल चा वापर दिशादर्शक आहे. अचूक,सहज, सुलभ आणि गतिमान अशा ज्ञानस्ञोतांना आत्मसात करित विद्यार्थांनी ज्ञानाची साधना करत जगाची नजर असणाऱ्या ज्ञानरथाचे सारथी बनत गुणात्म ,दर्जेदार चिंतनशील जगाची निर्मितीत योगदान द्यावे. महाविद्यालयीन ग्रंथालयांमधून अनेक विध सुविधा मोफत देत. ज्ञानसाधकाला ज्ञानचक्षूंची देण दिली.  एन लिस्ट चा आधार घेत विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक कार्यासाठी ई - बुक्सचा  आपल्या अभ्यासपूर्ण वाटचालीस अधिक प्रभावी करण्यासाठी वापर करावा असे आवाहन ग्रंथपाल डॉ. दत्तात्रय काळबांडे यांनी केले.

        स्वारातीम विद्यापीठ नांदेड चे ज्ञानस्ञोत केंद्र, ग्रंथालय विभाग आणि आयक्यूएसी विभाग कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी च्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थीनीं आणि प्राध्यापकांन साठी ऑनलाइन माहितीपर प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना डॉ.दत्तात्रय काळबांडे बोलत होते.

              कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य वसंतराव भोसले , प्रमुख उपस्थिती प्रा. डॉ. जगदीश कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा.डॉ.संगीता आवचार, ग्रंथपाल प्रा.संतोष कीर्तनकार आदींची उपस्थिती होती.

        व्यापक जग सॉफ्टवेअर मुळे अधिक जवळ आले आहे. त्याला विधायक वळण देताना जाणून घेत आपल्यातील जाणिवा वृद्धिंगत करण्याचा प्रभावी प्रयत्न म्हणजे ऑनलाइन ई जनरल बुक्स एन लिस्ट ही अभ्यासपूर्ण संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी उपकारक सुविधा असल्याचे प्रतिपादन डॉ.दत्ताञय काळबांडे यांनी केले.

         जागतिक पातळीवर संशोधन क्षेत्रात अभूतपूर्व कार्य करण्यासाठी विविध ऑडिओ ,व्हिडिओ सह प्रसार माध्यमे क्षणाक्षणाला सजग राहत लोकरंजनासह - लोकज्ञान लोकजीवनात प्रसारीत करत ज्ञानमयी जगाची ओळख निर्माण केली असल्याचे प्रतिपादन डॉ.जगदिश कुलकर्णी यांनी केले.

या व्याख्यानाचा २१ प्राध्यापक आणि १२२ विद्यार्थीनींनी लाभ घेतला प्रसंगी उपप्राचार्य डॉ.संगीता आवचार यांनी शुभेच्छा दिल्या.ग्रंथपाल प्रा.संतोष कीर्तनकार यांनी प्रास्ताविक करुन संचलन केले.आभार प्रा.डॉ.ओमप्रभा लोहकरे यांनी व्यक्त केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या