💥पुर्णा तालुक्यातील मौ.माखणी येथील विद्यार्थीनी कु.गायत्री चांदाजी आवरगंडने मिळवले एमएमएमएस परीक्षेत यश....!


💥कु.गायत्री आवरगंड हिच्या या यशा बद्दल तिचे माखणी ग्रामस्थाच्या वतीने कौतुक करण्यात आले💥

पुर्णा (दि.०२ सप्टेंबर) - पुर्णा तालुक्यातील मौ.माखणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनी कु.गायत्री चांदाजी आवरगंड या विद्यार्थीनीने एमएमएमएस परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.ती पहिलीच माखणीची विद्यार्थीनी आहे की जी या परीक्षेत पात्र ठरली आहे.

 या परिक्षेसाठी कु.गायत्री आवरगंड हिला सुनिल शेळके सर यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.तिच्या या यशात तिचे आई वडील मार्गदर्शक शिक्षक संजयकुमार जोशी सर,राजकुमार ढगे सर,सुरज पौळ सर,गजानन पवार सर,राम महाजन सर व सौ ज्योती झटे मँडम व माखणी गावकऱी मंडळीचा सुद्धा मोलाचा वाटा आहे.असे प्रतिपादन तिचे पालक चांदाजी आवरगंड यांनी व्यक्त केले.

कु.गायत्री आवरगंड हिच्या या यशा बद्दल तिचे माखणी ग्रामस्थाच्या वतीने कौतुक करण्यात आले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या