💥पुर्णा तालुक्यातील खांबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सत्यशोधन दिन साजरा....!


💥महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजन💥

पुर्णा (दि.२१ सप्टेंबर) - तालुक्यातील खांबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सत्यशोधन दिनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी शाळेतील सर्व शालेय विद्यार्थ्यांना सत्यशोधन दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन करण्यात आले. मानवी जीवनामध्ये विज्ञानाची कास धरून विवेकी विचार करून आपण आपले जगणे सुंदर करावे असा संदेश यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला.

 याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पूर्णाचे कार्याध्यक्ष डॉ. दिलीप शृंगारपुतळे व प्राथमिक शाळा खांबेगाव येथील सहशिक्षक श्री गजानन तांबे सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  मुख्याध्यापक श्री. मारोती वाडीकर हे उपस्थित होते. याप्रसंगी श्रद्धा, अंधश्रद्धा, भोंदूगिरी, चमत्कार आणि फसवणूक या संदर्भाने विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद ही साधण्यात आला. परिसरात घडणाऱ्या अनेक घटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या शंका उपस्थित केल्या या शंकांचे रीतसर निरसन करण्यात आले.

याप्रसंगी काही छोट्या चमत्कारांचे  प्रात्यक्षिक व य्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शालेय विद्यार्थ्यांनी केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या