💥पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळीत स्वदेस फॉउंडेशन तर्फे सामान्य ज्ञान परीक्षा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न...!


💥या कार्यक्रमाचे उदघाटन गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकरजी गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले💥


पुर्णा (दि.०७ सप्टेंबर) - तालुक्यातील धनगर टाकळी गावात दि.०६ सप्टेंबर २०२२ रोजी स्वदेस फॉउंडेशन तर्फे सामान्य ज्ञान परीक्षा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. मागच्या सहा वर्षा पासून हा उपक्रम राबवला जातं आहे.या कार्यक्रमाचे उदघाटन गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. रत्नाकरजी गुट्टे यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे पूर्ण कार्यक्रम होई पर्यंत  आमदार साहेब उपस्थित होते. आमदार साहेबांनी उदघाटन पण मार्गदर्शना मध्ये बोलत असताना त्यांचा पूर्ण जीवन प्रवास सांगितला, भरपूर असे मार्गदर्शन आमदार साहेबांनी गावातील विद्यार्थी, पालक आणि गावकरी मंडळीना केले.


      विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यासाठी विद्यार्थी प्रिय प्रा. शेख रफिक सर (डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम फॉउंडेशन  परभणी ) आले होते, स्पर्धा परीक्षा वर सखोल असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थी आणि पालक यांना केले. सामान्य ज्ञान परीक्षेला आणि मार्गदर्शन कार्यक्रमाला गावातील मुलांनी आणि पालकांनी भर भरून असा प्रतिसाद दिला. या परीक्षेला एकूण 537 विद्यार्थी बसले होते. परीक्षा योग्य रित्या पार पाडण्यासाठी  सर्वांनी सहकार्य केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या