💥गणेशोत्सव काळात ग्रामीण भागातील रात्रीचे भारनियमन तात्काळ रद्द करा....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाची महावितरण कडे मागणी💥

परभणी (दि.०२ सप्टेंबर) - जिल्हयामध्ये ग्रामीण भागात रात्रीचे भारनियमन ( लोडशेडिंग ) सुरु असुन सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सव व गौरी ( महालक्ष्मी ) सणाच्या पार्श्वभूमीवर १० दिवसांसाठी ग्रामीण भागातील रात्रीची लोडशेडिंग बंद करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागामध्ये गणेशोत्सव व गौरी सण मोठया प्रमाणावर साजरा केला जातो  या निमित्त गावागावांमध्ये उत्सव साजरे केले जातात.

शहरी भागात जरी भारनियमन ( लोडशेडिंग ) नसले तरी ग्रामीण भागात मात्र रात्रीची लोडशेडिंग मोठया प्रमाणावर चालु आहे. सणावाराच्या काळामध्ये भारनियमन चालु ठेवणे हे अत्यंत चुकीचे असून ग्रामीण भागातील रात्रीचे भारनियमन गणेशोत्सव तथा गौरी सणाच्या कालावधीत १० दिवसांसाठी थांबवावे व ग्रामीण भागासाठी गणेशोत्सव कालावधीकरिता २४ तास विद्युत पुरवठा उपलब्ध करुन द्यावा अश्या मागणीचे निवेदन आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महावितरण कंपनी च्या अधिक्षक अभियंता यांना देण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्युत वितरण प्रणाली विसखळीत असून भारनियमन व्यतिरिक्त अनेक लहान सहान कारणाने ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडित होत असतो. ग्रामीण भागातील डी पी नेहमी नादुरुस्त असतात असे असतांना ही सणावाराला  केलेले ग्रामीण भागातील रात्री चे भारनियमन जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार आहे असे ही या निवेदनात म्हंटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हाप्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख माधवीताई घोडके, उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, महिला आघाडी शहर प्रमुख आरतीताई जुमडे, उपशहर प्रमुख महानंदाताई माने, शहर चिटणीस वैभव संघई, शेख अफसर, सय्यद नाजेर इत्यादींच्या स्वाक्षर्‍या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या