💥पुर्णा तालुक्यातील माखणी येथे लंम्पी लसीकरनाला उत्स्फूर्त प्रतिसाद...!


💥लंपी स्कीन आजार होऊ नये म्हणून 513 गाय वर्गीय जनावरांना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले💥

पुर्णा (दि.१८ सप्टेंबर) -पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथून जवळच असलेले मागणी येते पशुवैद्यकीय दवाखाना ताडकळस अंतर्गत लंपी स्किन डिसीज या आजाराचे लसीकरण दिनांक 17 सप्टेंबर रोजी करण्यात आले.

 परभणी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सद्या लंपी आजाराने थैमान घातले असून अनेक अनेक जनावरे मृत्युमुखी पडत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

लंपी स्कीन आजार होऊ नये म्हणून 513 गाय वर्गीय जनावरांना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी डॉ.लक्ष्मण कणले पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती पूर्णा व डॉ. विश्वंभर बिरादार सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.श्रीधर सलगर, डॉ.माणिक हजारे ,डॉ.पोले यांनी यांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या