💥पुर्णा तालुका पशु वैद्यकीय रुग्नालय प्रशासन लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सज्ज.....!💥पुर्णा पशु वैद्यकीय रुग्नालया अंतर्गत येणाऱ्या अठवा गावांसाठी तब्बल मुबलक प्रमाणात लम्पी प्रतिबंधात्मक लस उपलब्ध💥

पुर्णा (दि.१४ सप्टेंबर) - संपूर्ण राज्यासह परभणी जिल्ह्यात देखील लम्पी या आजाराने अक्षरशः थैमान घातले असून राज्यात आतापर्यंत २ हजार ६६४ पशुरुग्न संक्रमित झाले असून राज्यातील तब्बल ३३८ गावांमध्ये लम्पी आजाराची लागण झालेली जनावर आढळली असून परभणी जिल्ह्यात देखील हळुवारपणे लम्पी आजाराचा शिरकाव झाल्याचे निदर्शनास येत असून या आजाराचा परभणी जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यात प्रादुर्भाव वाढू नयें याकरिता जिल्हा प्रशासनासह पशु वैद्यकीय रुग्नालय प्रशासन देखील सज्ज झाल्याचे दिसत असून लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता मोठ्या प्रमाणात लंपी स्कीन डिसेस (एलएसडी) लम्पी आजार प्रतिबंधात्मक,लस उपलब्ध करुण देण्यात आली असून पुर्णा तालुका पशु वैद्यकीय रुग्नायत देखील एलएसडी लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्याचे मुख्य पशु वैद्यकीय विकास अधिकारी डॉ.श्रीनिवास कारले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले यावेळी डॉ.कारले म्हणाले की पुर्णा पशु वैद्यकीय रुग्नालया अंतर्गत येणाऱ्या १८ गावां पैकी स्थानिक पुर्णेसह गौर,कानखेड,आडगाव,खुजडा या पाच गावांमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून या गावांमध्ये तब्बल २५  कर्मचारी यशस्वीपणे लसीकरण मोहीम राबवत आहेत.

💥पुर्णा तालुक्यात आढळली लम्पी चर्मरोगग्रस्त पाच ते सहा जनावर :-


पुर्णा शहरासह तालुक्यात चार ते पाच लम्पी चर्मरोग ग्रस्त जनावर आढळली असल्यामुळे पुर्णा तालुका पशु वैद्यकीय रुग्नालय प्रशासनाचे अधिकारी सतर्क झाले असून या लम्पी आजारग्रस्त जनावरांमध्ये पुर्णा शहरातील हिंगोली गेट परिसरातील गौस पठाण यांच्या २ बैलांचा समावेश असून फुकटगाव येथील शेतकऱ्यांचा १ बैल १ गाय तर कानखेड येथील शेतकरी गोविंद देशमुख यांची १ गाय तर खुजडा येथील शेतकरी प्रभाकर भाकरे यांचा १ बैल अश्या सहा जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली असून या लम्पी आजारग्रस्त जनावरांवर पशु वैद्यकीय रुग्नालयाचे मुख्य अधिकारी तथा पशुधन विकास अधिकारी डॉ.श्रीनिवास कारले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सिध्दार्थ कापुरे,डॉ.बुचाले,डॉ.कचरे,डॉ.बिराजदार,डॉ.भोसले,डॉ.रोडगे,डॉ.कपिल,यांच्यासह धम्मा गायकवाड,धम्मा पंडीत,आकास कापुरे यशस्वीपणे उपचार करत असून लसीकरण मोहीम देखील यशस्वीपणे राबवत आहेत.


मागील वर्षी तालुक्यातील धनगर टाकळी येथील पांडुरंग साखरे यांच्या शेतातील बैलाला लम्पीची आजाराची लागण झाली होती सदरील बैलावर उपचार देखील करण्यात आले होते त्याच बैलाला पुन्हा लम्पी आजाराची लागण झाल्याचे निदर्शनास येत असून त्याच्यावर देखील पशु वैद्यकीय अधिकारी उपचार करीत आहेत.

💥लम्पी प्रतिबंधात्मक लंपी स्कीन डिसेस (एसएसडी) लसीची अतिरिक्त दराने विक्री :-


पुर्णेतील पशु वैद्यकीय रुग्नालयात लम्पी प्रतिबंधात्मक लंपी स्कीन डिसेस लस उपलब्ध होण्यापुर्वी शहरातील झिरो टी पॉईंट परिसरातील एका मेडीकल व्यतिरिक्त एलएसडी लस कुठेही उपलब्ध नसल्यामुळे संबंधित मेडीकल चालकाने ६९० रुपये अधिकृत किंमत असलेली ही एलएसडी लस तब्बल ११६० रुपयांना विक्री करून पशुपालक शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केल्याचे शेतकऱ्यांकडून समजले पशुपालक शेतकऱ्यांची अश्या प्रकारे आर्थिक पिळवणूक होता कामा नये याकरिता शासनाने शासकीय पशु वैद्यकीय रुग्नालयांमध्ये मुबलक प्रमाणात एलएसडी लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

💥लम्पी आजारग्रस्त जनावरांपासून मनुष्याला धोका नाही ?

लम्पी चर्मरोग आजारग्रस्त जनावरांपासून किंवा या जनावरांच्या दुधामुळे या रोगाची लागण मनुष्यास देखील होऊ शकते असा गैरसमज पसरल्यामुळे भितीचे वातावरण पसरले होते परंतु अश्या जनावरांपासून किंवा त्यांच्या दुधापासून मनुष्याला कसलाही धोका नसून लम्पी आजार हा मनुष्याला होत नाही असे स्पष्टीकरण देखील पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या