💥 टेरर फंडिंग प्रकरणात परभणीतील 'पीएफआय'चे चौघे जन 'एनआयए'च्या ताब्यात जिल्ह्यात माजली खळबळ....!


💥या पथकांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने कारवाई : चौघांची चौकशी सुरू💥 

परभणी (दि.22 सप्टेंबर) - परभणी शहरातील मध्यवस्तीतून टेरर फंडिंग प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए ) कडून आज गुरुवार दि.२२ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास एटीएस पथकांच्या सहकार्याने चौघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 एनआयए या संस्थेने ठाण्यातील काळाचौकी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे  नांदेड व औरंगाबाद येथील एटीएसच्या पथकांच्या सहकार्याने आज गुरुवारी सकाळी 05-00 ते 05-30 वाजेच्या दरम्यान परभणीतील पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या चौघांना ताब्यात घेतले लगेचच या चौघांसह हे पथक अज्ञात स्थळी रवाना झाले

या पथकांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने कारवाई केली. या चौघांची चौकशी सुरू आहे. दरम्यान परभणी नांदेड व अन्यत्रही एनआयए या संस्थेद्वारे कारवाई केली जात आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या