💥पुर्णा तालुक्यातील आडगाव शिवारात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह....!


💥या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटावी या दृष्टीने प्रयत्न सुरु💥

पूर्णा (दि.०५ सप्टेंबर) - पुर्णा तालुक्यातील आडगाव (लासीना) शिवारात काल शनिवार दि.०३ सप्टेंबर २०२२ रोजी रात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.

  या घटने संदर्भात अधिक माहिती अशी की आडगावचे पोलिस पाटील अंकुश शिवसांभ भालेराव यांनी पूर्णा पोलिस स्थानकास आडगाव शिवारातील गट क्रमांक ७८ या काळे यांच्या शेतामध्ये हिवराच्या झाडाजवळ मृत अवस्थेत एक व्यक्ती आढळून आल्याची माहिती दिली. त्याआधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतला. सर्वसाधारण १५९ सेंटी मीटर उंच,रंग काळा, मजबुत बांधा, पेहराव लाल नाड्याची चड्डी, अंकात कपडे नसलेला, पायात काळे रबरी बुट अशा वर्णनाच्या पुरुषाची पूर्णा पोलिसांना ओळख पटली नाही. पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटावी या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या