💥कै.दत्तराव बोबडे यांच्या पुण्यतिथी निमित्त गोपीचंदगडावर रंगला भजन सोहळा....!


💥पडेगाव येथे सोमवारी भजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते💥

गंगाखेड प्रतिनिधी

कै.दतराव बोबडे यांच्या 24 व्या पुण्यतिथीनिमित्त पडेगाव येथील गोपीचंदगड शिवारात भजन सोहळा व महाप्रसाद सोमवारी संपन्न झाला.


आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांचे आजोबा कै. दत्तराव बोबडे  यांच्या 24 व्या पुण्यतिथीनिमित्त पडेगाव येथे सोमवारी भजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यात पडेगाव, बनपिंपला व पंचक्रोशीतील भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यानंतर महाप्रसाद संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन ग्यानबा बोबडे व सोनबा बोबडे यांच्यावतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संभाजी बोबडे, दिगंबर बोबडे ,दत्ता बोबडे, आशिष बोबडे, अविष्कार बोबडे, सिद्धेश्वर बोबडे, वेदांत बोबडे, उत्तमभाऊ बोबडे, माणिक बोबडे, राजेभाऊ राठोड, केशव काळे ,महादू काळे ओंकार बोबडे ,विजय बोबडे,दीपक बोबडे यांचे सह परिसरातील युवकांनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या