💥परभणी जिल्ह्यातील सर्व शाळांनी तंबाखू मुक्त व कोटपा कायदा 2003 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी....!


💥जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे जिल्ह्यातील सर्व शाळांना आदेश💥

परभणी (दि.26 सप्टेंबर) :  तंबाखू मुक्त शाळांचे 9 निकष या प्रमाणे सर्व शाळांनी आपापल्या शाळा तंबाखू मुक्त कराव्यात तसेच पोलीस विभाग, अन्न व औषध प्रशासन व  राष्ट्रीय तंबाखू नियत्रंण कार्यक्रम यांनी कोटपा कायदा 2003  ची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची जिल्हास्तरीय समन्वय समितीची त्रेमासिक बैठक जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास जगताप, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. जयश्री यादव, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन नारायण सरकटे, महानगरपालीकेचे वैद्यकीय अधिकारी  डॉ. कल्पना सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती गोयल म्हणाल्या की, जिल्ह्यात ज्या ठिकाणी कोटपा कायद्याचे उल्लंघन होत असेल, तिथे कडक कार्यवाही करावी. प्रत्येक तालुक्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची तालुकास्तरीय समन्वय समिती स्थापन करुन प्रत्येक तालुक्यात कोटपा कायद्याची अंमलबजवणी करण्यासाठी पथक स्थापन करावे . तसेच कोटपा कायदा 2003 चे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करावी. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व पोलीस अधिकारी यांची कार्यशाळा आयोजीत करावे अशा सूचनाही  जिल्हाधिकरी आंचल गोयल यांनी यावेळी दिल्या.


यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी महानगरपालीका यांच्याकडील घंटा गाडीवर तंबाखू विरोधी जन जागृतीच्या ऑडिओ क्लिप द्वारे जनजागृती करण्याच्या सूचनाही दिल्या.यावेळी मागील एप्रिल ते ऑगस्ट 2022 या कालावधीत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे मानस तज्ज्ञ केशव गव्हाणे यांनी झालेल्या कामाची माहिती सादर केली. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबादचे अभिजीत संघई यांची तंबाखू मुक्त शाळा याबाबतच्या 9 निकष बदल माहिती सांगितली.

यावेळी अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. जी. के. सिरसूलवार, गट विकास अधिकारी एस.आर.कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.एम.सोनवणे, पोलीस उपनिरिक्षक वेंकट कुसाने, शिक्षणाधिकारी (प्रा.) विठ्ठल भुसारे, शिक्षणाधिकारी (मा.) आशा गरूड, जिल्हा कामगार अधिकारी  व्ही. एन. मानगावकर,  जिल्हा कार्यक्रम समन्वयक एन. सी. डी. पांडुरंग अवचार यांचीही उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या