💥स्वामुक्टा नांदेडच्या वतीने स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा, विद्यापीठासमोर धरणे आंदोलन....!


💥याप्रसंगी स्वामुकटा चे अध्यक्ष डॉ.श्रीरंग खिल्लारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले धरणे💥

महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या 8 मे 2022 रोजी झालेल्या कार्यकारिणी बैठकीमधील ठरावानुसार, आपल्या विविध प्रलंबित  मागण्यासाठी महाविद्यालयीन प्राध्यापकांनी आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड समोर आज मोठया संख्येने धरणे आंदोलन केले. 

विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) यांच्या दि १८ जुलै २०१८ रोजीच्या अधिसुचनेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने उच्च शिक्षण विभागाच्या  दि. ८ मार्च  २०१९ व शासन शुद्धिपत्रक दि. १० मे २०१९ अन्वये करण्यात आलेले बदल रद्द करण्यात यावे. तसेच सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या  दि.३१.०१.२०१८ रोजीच्या अधिसूचनेद्वारे देण्यात आलेले आदेश जशास तसे लागू करण्यात यावेत, विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी)  अधिसुचनेमधील तरतुदीनुसार महाविद्यालयीन प्राध्यापकांना अनुज्ञेय असलेल्या सर्व प्रकारच्या रजा लागु करण्यात याव्यात दि.०१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, सद्यस्थितीतील नवीन परिभाषीत पेन्शन योजनेतील (DCPS) प्राध्यापकांना त्यांच्या वेतनातून दरमहा होणारी कपात, शासनाचे अंशदान व त्यावरील व्याज याबाबतचा हिशोब दर्शवणारी माहिती पावती स्वरूपात देण्यात यावी, विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या  मार्गदर्शक तत्वानुसार प्राध्यापकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी,एकरुप परिनियम (Uniform Statutes) लागु करणे बाबत:  सर्वच विद्यापीठात परिनियम एकसमान असले पाहिजे ह्या उद्देशाने उच्च शिक्षण विभागाने एकरुप परिनियम तयार करुन विविध घटकांशी चर्चा केली आहे. सध्या सर्वच विद्यापीठात परिनियम वेगवेगळे आहेत त्यामुळे एकरुप परिनियम लवकरात लवकर लागु करावेत, तासिका तत्वावरील अध्यापकांना सुधारित मानधन दरानुसार दरमहा वेतन अदा करण्यात यावे. याशिवाय विद्यापीठ व महाविद्यालय पातळीवरील प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांच्या बाबतीत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी स्वामुकटा चे अध्यक्ष डॉ श्रीरंग खिल्लारे, सचीव डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ. गौतम दुथडे, डॉ. रामचंद्र भिसे, डॉ. नानासाहेब पाटील, डॉ. काशीनाथ चव्हाण, डॉ. सुधीर वाघ, डॉ. डी.एन. मोरे, डॉ. अमोल लाटे, डॉ. किशोर हुग्गे, डॉ. करुणा देशमुख, डॉ. शिल्पा पाटील, डॉ. पुष्पा गंगासागरे, डॉ. देशमुख, डॉ. विजय भोपाळे, डॉ. मनोजकुमार सोमवंशी, डॉ. संजीव अग्रवाल चारही जिल्ह्यातुन मोठ्या संखेने पदाधिकारी व सदस्य प्राध्यापक सदरील आंदोलनात सहभागी झाले होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या