💥परभणीत क्रिडा दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन....!


💥राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दि.29 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय खुल्या मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन💥

परभणी,(दि.26 आगष्ट) : जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी आणि परभणी जिल्हा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ , एकविध संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 29 ऑगस्ट मेजर ध्यानचंद (हॉकीचे जादूगर) यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दि. 29 ऑगस्ट, 2022 रोजी जिल्हास्तरीय खुल्या गट (मुले/मुली) 5 कि.मी. धावणे मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

             दि. 29 ऑगस्ट, 2022 रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळी 7 वाजता सदरील मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन होणार असून शहरातील जिल्हा क्रीडा संकुलापासुन सुरुवात होवून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे काळी कमान विद्यापीठ गेट व परत जिल्हा क्रीडा संकुल या मार्गावर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजयी दोन्ही गटातील पहिल्या पाच स्पर्धेकांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने रोख पारितोषिके, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. दोन्ही गटासाठी प्रथम 1500 रुपये, द्वितीय 1000 रुपये, तृतीय 700 रुपये, चतुर्थ 500 रुपये,  पाचवा 500 रुपये याप्रमाणे रोख पारितोषिकाचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील सहभागी सर्व स्पर्धेकांनी आपल्या नावाची नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे 28 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत करुन स्पर्धेत जास्तीत-जास्त खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.....


                                                             

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या