💥परभणीत मंडप तपासणीसाठी संनियंत्रण समिती गठीत....!


💥असे आदेश जिल्हादंडाधिकारी आंचल गोयल यांनी जारी केले आहेत💥

परभणी (दि.12 आगस्ट) : महापालिका क्षेत्रामध्ये सार्वजनिक सण, उत्सव, समारंभ यासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडप पेंडॉल तपासणीबाबत वस्तुनिष्ठ तपासणी अहवाल संबंधित सक्षम संबंधित प्राधिकाऱ्याकडे आवश्यक कार्यवाहीसाठी सादर करणेसाठी सन 2022 साठी परभणी जिल्ह्यातील परभणी महानगरपालिका क्षेत्रांकरिता जिल्हा‍निहाय संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. 

यामध्ये अध्‍यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी डी.बी.शेवाळे, सदस्य महापालिका उप आयुक्त प्रदीप जगताप आणि सहायक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अविनाश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे सार्वजनिक सण/उत्सव/समारंभ सुरु होण्यापुर्वी किमान 7 दिवस अगोदर तात्पुरत्या मंडपाची तपासणी करावी व त्याचा अहवाल सण/उत्सव/समारंभ सुरु होण्यापुर्वी 3 दिवस अगोदर महापालिकेस देणे क्रमप्राप्त आहे. या प्रकरणी मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान होणार नाही याबाबत आवश्यक ती दक्षता मंडप तपासणी संनियंत्रण समितीने घ्यावी. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आंचल गोयल यांनी जारी केले आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या