💥परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील मौ.निळा येथील महिला बचतगटाला उद्योगासाठी जागा उपलब्ध करुन द्या...!


💥प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी💥

परभणी - पुर्णा तालुक्यातील मौजे निळा येथे गावातील महिलांनी एकत्र येवून मातोश्री ग्रामसंस्था या नावाने १० वर्षापूर्वी महिला बचतगट स्थापन केला. बचत गटासाठी व्यवसाय उभारणी करीता गावातील १.५० गुंठे जमीन देण्याबाबत ग्राम पंचायत मौजे निळा यांनी सर्व संमतीने ठराव पास केला. 


परंतु संबंधित प्रकरण पूर्णा तालुक्याचे गटविकास अधिकारी सुनिता वानखेडे यांच्याकडे प्रलंबित असून ते जागेच्या ठरावा प्रमाणे परवानगी देण्यास तयार नाहीत. ग्राम पंचायतीने ठराव पास करुन गावातील ग्रामपंचायतीची जागा देण्याबाबत ठराव पास केल्यानंतरही हेतुपुरस्कर गटविकास अधिकारी पूर्णा सदरील प्रस्तावास मंजूरी देत नाहीत. 

ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे बाबत शासनाचे धोरण आहे व जिल्हाधिकारी कार्यलयातून या बचत गटास उद्योगासाठी १२ लाख रुपये शासकीय निधी उपलब्ध झाला आहे. जागे बाबत गट विकास अधिकारी यांना लेखी विनंती करुनही प्रस्तावावर कार्यवाही केली जात नाही.

या बाबत संबंधित महिला बचत गटाच्या सदस्यांनी उद्योगासाठी ग्रामपंचायतीच्या ठरावाप्रमाणे जागा उपलब्ध करून देऊन न्याय मिळवून द्यावा अशा मागणी चे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाकडे दिले आहे.  या निवेदनाची तात्काळ दखल घेत आज प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाचे पदाधिकारी व बचत गटाच्या सदस्यांच्या शिष्टमंडळासह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांना निवेदन देऊन या प्रकरणामध्ये तात्काळ लक्ष देवून मातोश्री ग्राम संस्था या महिला बचत गटास व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन देणे बाबत गटविकास अधिकारी पूर्णा यांना आदेशित करावे अशी मागणी केली आहे. तसेच हेतुपुरस्कर त्रास देण्याऱ्या पूर्णा गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी करून कार्यवाही करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गटविकास अधिकारी पूर्णा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असेही या निवेदनात म्हटले आहे. 

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हाप्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके, उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, पूर्णा तालुकाप्रमुख शिवहर सोनटक्के, परभणी तालुकाप्रमुख ज्ञानोबा काळे, शहरचिटणीस वैभव संघई, महिला आघाडी उपशहर प्रमुख महानंदाताई माने, शेख बशीर, सर्कल प्रमुख श्रीहरी इंगोले,  सर्कल प्रमुख गजानन कुऱ्हे, मंचक कुऱ्हे, सीताबाई सुक्रे बालिकाबाई मासे, गंगुबाई पवार, मैनाबाई सूर्यवंशी, अनिताबाई पोळ, गोदावरीबाई सूर्यवंशी, कान्होपात्रा बाई सूर्यवंशी, यमुनाबाई जोगदंड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या