💥परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते पुर्णा तालुक्यातील चुडावा येथे वृक्षारोपण संपन्न....!


💥वृक्षलागवड योजनेचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षांची जोपासना करीत पर्यावरणाचे स्वरक्षण करावे - जिल्हाधिकारी

पुर्णा (दि.०१ आगस्ट) :- पुर्णा येथुन जवळ असलेल्या चुडावा येथे जिल्हा परिषद परभणी व पंचायत समिती पूर्णा व माननीय जिल्हाधिकारी परभणी यांच्या हस्ते घन वन लागवड व वृक्षारोपण कार्यक्रम आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी चुडावा येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ घोंसिकर, पल्लवी टेमकर तहसीलदार पूर्णा पल्लवी टेमकर, गटविकास अधिकारी सुनीता वानखेडे, कृष्णा देशाई कीरन बनसोडे  साहेबराव सुरेवाड व तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा चुडावा ग्रामस्थाच्या वतीने जिल्हाधिकारी मॅडम च्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आघ्यक्ष म्हणून रामेश्वर देशाई प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आंचल गोयल, शिवानंद टाकसाळे,हे उपस्थित होते. या शिवानंद टाकसाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना  पूर्ण क्षेत्र फळाच्या 33% क्षेत्रावर वृक्षाची लागवड करा व तापमान कमी करण्यास पर्यावरणाला मदत करा असे आव्हान चुडावा  सत्कार सोहळ्यात बोलतांना त्यांनी केले. 

             यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी असे म्हटले की वृक्षलागवड योजनेचा यथोचित फायदा घेऊन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षांची जोपासना करून पर्यावरणा चे स्वरक्षण करावे. यावेळी तलाठी,ग्रामसेवक आदींना उद्दिष्ट पूर्ण करून, स्वतंत्र च्या अमृत मोहोत्सव निमित्त हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी व्हा असे आव्हान केले. 

             किरन बनसोडे  यांनी प्रास्ताविक केले तर कृष्णा देशाई यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या