💥अंत्योदय हेच केंद्र सरकारचे उद्दिष्ट्य - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी


💥केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात नवी दिल्लीत आझादी का अमृत महोत्सव साजरा💥 


✍️ मोहन चौकेकर 

नवी दिल्ली (दि.03 आगस्ट) - समाजातील गरीब निर्धन दलित शोषित पीडित माणसाला आपले दैवत मानून त्यांची सेवा करणे; त्यांना अन्न वस्त्र निवारा देणे; समाजातील शेवटच्या गरीब दलित शोषित पीडित माणसाला मदत करून त्यांचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक प्रश्न सोडविणे हाच अंत्योदयाचा अर्थ असून अंत्योदय हेच केंद्र सरकारचे उद्दिष्ट्य आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या पुढाकारातून नविदिल्लीतील तालकटोरा स्टेडियम मध्ये  आझादी का अमृतमहोत्सव आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ना.नितीन गडकरी बोलत होते.


यावेळी गेली 40 वर्षे आपण रामदास आठवले यांना दलित शोषित वर्गासाठी काम करताना पहात असून त्यांनी दलित मागास शोषित वर्गासाठी स्वतःचे जीवन समर्पित केले असल्याचे गौरवोद्गार ना.  नितीन गडकरी यांनी काढले.  एनडीए चे घटक भाजपसोबत  रिपब्लिकन पक्ष सहयोगी असून रामदास आठवले यांच्या सोबत आम्ही सर्व शक्तीनिशी आहोत असे ना. नितीन गडकरी म्हणाले. 

दिल्ली ते हरिद्वार 2 तास; दिल्ली ते जयपूर 2 तास ; दिल्ली ते चंदीगड 2 तास 30 मिनिटे तर दिल्ली ते मुंबई केवळ 12 तासांत तुम्हाला पोहोचता येईल असे वेगवान रस्ते आम्ही तयार करीत आहोत. हे सर्व विकासाचे  काम आम्ही करू शकलो ते केवळ भारतीय जनता आमच्या सोबत असल्यामुळे असे ना.नितीन गडकरी म्हणाले. 

स्वातंत्र्यायाच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारतीय स्वातंत्र्य लढा आणि त्यातील शाहिदांची आपण आठवण ठेवली पाहिजे. स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आपण विसरता कामा नये.  स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या काळात राजकीय जागृती   आली आहे.मात्र राजकीय स्वातंत्र्य  लाभले असले तर सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य ;सामाजिक आणि आर्थिक समता निर्माण करण्याचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उद्दिष्ट्य अद्याप साकार झाले नाही ते साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकार  प्रयत्नशील आहे असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले. 

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; भुपेश थुलकर; एम एस नंदा;  दिल्ली चे प्रदेश अध्यक्ष मिरझा मेहताब बेग; ब्रह्मानंद रेड्डी; चिबेर; प्रकाश लोंढे ; अनिल कुमार यांनी यावेळी आपले विचार मांडले यावेळी संपूर्ण देशातून रिपब्लिकन कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.....

✍️ मोहन चौकेकर                

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या