💥परभणी जिल्ह्यातील सेलू येथे आझादी का अमृत महोत्सवा निमित्त मॅरेथॉन व सायकल रॅली संपन्न...!


💥लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली रॅलीची सुरुवात💥


परभणी (दि.06 आगस्ट) :- आझादी का अमृत महोत्सवा निमित्ताने उपविभागीय कार्यालय सेलू,नगरपरिषद सेलू व गटशिक्षणाधिकारी कार्यालय सेलू च्या वतीने सेलू शहरात मॅरेथान व सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार दिनेश झांपले, मुख्याधिकारी देविदास जाधव, गट शिक्षणाधिकारी उमेश राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांनी रॅलीची तिरंगा उंचावून सुरुवात केली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली.


        भव्य रॅलीत भारत देशाच्या ७५ आझादी महोत्सवानिमित्ताने हजारों विद्यार्थीनी स्वराज्य महोत्सव जनजागृती करत देशभक्ती पर घोषणा देत शहरातील विविध भागात रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅली टिळक पुतळा-गणपती गल्ली-ब्राम्हण गल्ली-बाजार रोड ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिंतूर कॉलनी-हुतात्मा स्मारक -नूतन विद्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. सेलू शहराचे भाग्यविधाते दलित मित्र कै. श्रीरामजी भांगडिय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समारोप झाला. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, नूतन संस्था सचिव डॉ विनायकराव कोठेकर यांनी रॅलीला संबोधित केले. याप्रसंगी तहसीलदार दिनेश झांपले, मुख्याधिकारी देविदास जाधव, गटशिक्षणाधिकारी राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे,   मुख्याध्यापक नारायण सोळंके, संगिता खराबे या रॅलीचे संयोजन तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. या रॅलीला सेलू शहरातील नूतन विद्यालय, प्रिन्स इंग्लिश स्कूल, मॉडर्न इंग्लिश स्कूल, श्री.के.बा.विद्यालय, शारदा विद्यालय, न्यु.हायस्कुल , डॉ. झाकीर हुसेन हायस्कूल, यासेर उर्दू , यशवंत विद्यालय, नूतन कन्या प्रशाला, जिजामाता बालक विद्यामंदिर सेलू आदी शाळेचा सहभाग यांचा सहभाग होता.....


****टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या