💥परभणी जिल्ह्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गांची अर्धवट काम गुरफटली भ्रष्टाचारात : इतर रस्त्यांची देखील भयावह अवस्था...!


💥खासदार श्रीमती फौजिया खान यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचे वेधले लक्ष💥

परभणी (दि.०४ आगस्ट) : जिल्ह्यातील राजकीय रंगमंचावर तथाकथित धर्म आणि धार्मिकतेची छोळी बनवून जनसामान्यांच्या मतदानावर निवडून येणाऱ्यांनी स्वतःसह स्वतःच्या सात पिढ्यांचा तर मोठ्या प्रमाणात विकास केला परंतु जिल्ह्याला मात्र विकासाच्या नावावर संपूर्णतः विकासापासून वंचित ठेवण्याचे महापाप केले जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांसह अन्य रस्त्यांची झालेली दयनिय अवस्था बघितल्यास एखाद्या आदिवासी दुर्गम भागाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही जिल्ह्यातील रस्त्यांसह औद्योगिक वसाहतींचा देखील यत्किंचितही विकास झालेला नाही या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची जिल्ह्यातील ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार श्रीमती फौजिया खान यांनी नवी दिल्लीत भेट घेवून परभणी जिल्ह्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गांच्या निकृष्ट दर्जाच्या व अर्धवट कामांसह इतर रस्त्यांच्या भयावह अवस्थेकडे लक्ष वेधले.

          श्रीमती खान यांना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जिल्ह्यातील समस्यांवर चर्चा करण्याकरीता आमंत्रीत केले होते. श्रीमती खान यांनी या महत्वपूर्ण भेटीतून जिल्ह्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग तसेच अन्य रस्त्यांच्या भिषण अवस्थेकडे गडकरी यांचे लक्ष वेधले. परभणी ते जिंतूर या महामार्गाचे काम अद्यापही अपूर्णच आहे. कोल्हा ते परभणी या महामार्गाच्या कामाऐवजी बांधकाम खात्याद्वारे केवळ खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले. तर परभणी ते झिरोफाटा या पुढील मार्गाचे काम पूर्णतः रखडले आहे, हे निदर्शनास आणून दिले.

           परभणी ते गंगाखेड या ७५२ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी नदीवरील पुलाच्या कामाबद्दलही मोठी संभ्रमावस्था असल्याचेही  नमूद केले. श्रीमती खान यांनी जिल्ह्यातील रस्ते समस्यांबाबत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यानंतर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या प्रश्‍नांबाबत सकारात्मक असा प्रतिसाद दिला. चर्चेतून कामांची ग्वाहीही दिली.

          दरम्यान, गडकरी यांनी या भेटीतून आपणास अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल श्रीमती खान यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या