💥गौर गावात चिखल की चिखलात गाव ? सार्वजनिक रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात दगडाची चुरी टाकून पाप का लपवताय राव ?


💥लाखो रुपयांच्या विकासनिधीच शेवटी भ्रष्ट ग्रामपंचायत प्रशासनाने केले तरी काय कोणास ठाव ?💥 



(भाग क्र.०५) : गाव तस चांगल पण.....

✍🏻परखड सत्य :- चौधरी दिनेश -

" गावच्या विकासाच्या नावावर भ्रष्टाचार कसा अनंत.....कोट्यावधी शासकीय विकासनिधीवर हाणतोय ताव....अन् अधिकारी आले की समद कस ओक्केच हाय म्हणतोय राव.....पारव्यापरी शासकीय विकासाचा निधी कागदावरी अन् कुठ कुठ उडतोय कोणाला ठाव ? "


पुर्णा (दि.०९ आगस्ट) - देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७५ वर्षे पुर्ण होण्यासाठी अवघ्या ५ दिवसाचा कालावधी बाकी असतांना व देशातील केंद्र सरकार व राज्य सरकार सर्वत्र राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करीत असतांना मात्र देशासह राज्यातील ग्रामीण भागातील गाव खेड्यांची अवस्था बघितल्यास असे वाटते की कदाचित् देश आज सुध्दा स्वातंत्र्य झालेला नाही....ग्रामीण भागातील गावांची अवस्था बघितल्यास असे निदर्शनास येते की देशातील गोऱ्या इंग्रजांचे राज्य जावून देशात काळ्या कृत्यांसह भ्रष्टाचाराला प्राथमिकता देणाऱ्या गावरान काळ्या इंग्रजांचे राज्य स्थापन झाले की काय ? असा प्रश्न सहज उपस्थित होतो.


परभणी जिल्ह्यात प्रचलित असलेल्या वाक्याचा इथे निश्चितच उल्लेख करावा वाटतो " जगात जर्मनी अन् भारतात परभणी अन् परभणीत पुर्णा अन् भ्रष्ट बेईमान राजकारण्यांना गिळायला येथे काहीही पुरणा ? " ग्रामीण भागातील गाव खेड्यांच्या विकासासाठी गावातील ग्रामपंचायतींना केंद्र सरकार व राज्य सरकार कडून जिल्हा परिषद/पंचायत समितीच्या माध्यमातून कोट्ट्यावधी रुपयांचा भरघोस शासकीय विकासनिधी प्राप्त होत असतांना देखील गावातील रस्ते नाल्यांच्या बांधकामांसह पाणीपुरवठा योजनांचाही प्रश्न देखील सुटला नसल्याचे निदर्शनास येत असून गावातील ग्रामपंचायतीपासून ते पंचायत समिती/ जिल्हा परिषद प्रशासनात कार्यरत भ्रष्टाचारी अधिकारी/कर्मचारी यांच्यासह जनमतावर निवडून येणाऱ्या भ्रष्ट बेईमान लोकप्रतिनिधींची एक प्रकारे साखळीच निर्माण झाल्याने केंद्र सरकार व राज्य सरकारच्या जनसामान्यांच्या हिताच्या विविध शासकीय योजनांची योग्य पध्दतीने अंमलबजावणी तर होतच नाही याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे शासनाने ग्रामीण भागांच्या सर्वांगीन विकासासाठी दिलेला शासकीय विकासनिधी देखील चोरांच्या घषात जात असल्यामुळे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात देखील विकासापासून वंचित राहिलेल्या गाव खेड्यातील सर्वसामान्य जनता शेवटी स्वातंत्र्य कशाला म्हणतात ? असा प्रश्न उपस्थित करतांना पाहावयास मिळत आहे.

असाच काहीसा प्रकार पुर्णा तालुक्यातील गौर या गावात देखील पाहावयास मिळत असून सांगोल्याचे बंडखोर शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांच्या भाषेत सांगायच झाल्यास.....काय ते  सुंदर गाव समद विकासापासूल वंचित ठेवलय राव....काय ते रस्त्यांवर जागोजाग पडलेले मोठमोठे खड्डे.....अन् काय ती हवा आली की हलणारी डोलणारी स्वागत कमान.....काय ती शासनाला फसवून लावलेली अन् पाण्याअभावी सुकलेली झाडी....काय त्या जागोजाग तुंबलेल्या बंदिस्त नाल्या अन् गावात सर्वत्र सुटलेल्या बिदाडीची दुर्गंधी....काय ती गावातली जिल्हा परिषदेची मोडकळीस येवून खंडार झालेली शाळेची इमारत....अन् काय ती रंगरंगोटी केलेली गावची बिनकामाची पिण्याच्या पाण्याची टाकी....समद कस ओक्केच हाय....बघा..


तालुक्यात गौर येथील ग्रामपंचाय प्रशासनाला केंद्र सरकार/राज्यसरकारसह समाजकल्याण विभाग तसेच केंद्र सरकारच्या विविध शासकीय योजनांतून मिळालेल्या कोट्यावधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीचा सखोल अभ्यास केल्यास असे निदर्शनास येते की या शासकीय विकासनिधीचा गौर ग्रामपंचायचे सरपंच पारवे व ग्रामविकास अधिकिरी लाढेकर यांनी योग्य पध्दतीने वापर केला असता तर कदाचित् गावातील सार्वजनिक रस्ते,नाल् (ड्रेनेज),बंदिस्त नाल्यांसह गावातील अंगनवाड्या जिल्हा परिषद शाळांसह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी सुटला असता परंतु ग्रामपंचायतील आलेल्या प्रत्येक शासकीय विकासनिधीत मोठ्या प्रमाणात अफरातफर झाल्यामुळे गावच्या विकासाची अक्षरशः विल्हेवाट लागली असून गावातील अंगणवाड्यांसह जिल्हा परिषद शाळा देखील मोडकळीस आल्यामुळे या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी अक्षरशः जिव धोक्यात घालून शिक्षण घेतांना पहावयास मिळत आहे.


गौर येथील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंत,शौचालय बांधकाम,शाळेसह/अंगणवाडी साहित्य खरेदी तसेच गावातील अंगणवाडी दुरूस्ती शाळा दुरूस्तीसाठी प्रथमतः २० लाख २२ हजार ९९२ रुपये व यानंतर पुन्हाजिल्हा परिषद शाळा दुरूस्ती,शाळा संरक्षण भिंत बांधकाम,शाळेतील शौचालय बांधकाम व शालेय साहित्य खरेदीसाठी १५ लाख २८ हजार ८४४ रुपयांचा शासकीय विकासनिधी प्राप्त झाल्यानंतर देखील गावातील जिल्हा परिषद शाळेसह अंगणवाड्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामूळे गौर ग्रामपंचायत प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराला पंचायत समिती बिडीओ वानखेडे यांच्यासह जिल्हा परिषद प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांचे देखील उघड पाठवळ असल्याचे निदर्शनास येत आहे..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या