💥पुर्णेतील कायदा व सुव्यस्थेला गालबोट लागू नये याकरीता वेळीच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या धगधगत्या 'तळीराम टेभ्यांना' आवरा....!


💥शहरात यथेच्छ मद्य प्राशन करून दिवसरात्र सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणाऱ्या 'तळीराम टेंभ्यांच्या' संख्येत वाढ💥


पुर्णा (दि.३० आगष्ट) - पुर्णा शहरासह संपूर्ण तालुक्यातील सर्वधर्मिय सर्वसामान्य जनता तसेच व्यापारी वर्ग सामाजिक बांधिलकीचे भान जोपासत अत्यंत शांततेत जिवण जगत असतांना मात्र राजकीय दडपशहांच्या अराजक मनोवृत्तीतून पैदा झालेली 'तळीराम टेंभ्यांची' फौज किरकोळ वादाला मोठ्या जातीयवादाचे स्वरूप देत शहरासह तालुक्यातील शांतता व सुव्यस्थेला केव्हा गालबोट लावण्याचा प्रयत्न करेल हे सांगता येत नाही.


शासन दरबारी अतिसंवेदशिल शहर म्हणून नोंद असलेल्या पुर्णा शहराचा पुर्व इतिहास बघितल्यास असे निदर्शनास येते की या शहरात जेव्हा जेव्हा लहान मोठ्या वादाला सुरूवात झाली त्या त्या वेळी वाद निर्माण करणाऱ्यांमध्ये मद्यपीं अर्थात 'तळीराम टेंभेच' आघाडीवर होते धार्मिक सामाजिक महोत्सव सन उत्सव असो की महापुरुषांच्या जयंती निमित्त आयोजित सार्वजनिक मिरवणूका प्रत्येक सार्वजनिक उत्सवात यथेच्छ मद्य प्राशन करून धगधगणारे 'तळीराम टेंभे' त्या सार्वजनिक उत्सवाला गालबोट लावण्यात आघाडीवर असतात.

शहरातील भर वसाहतींमध्ये हाकेच्या अंतरावर असलेल्या देशी/विदेशी दारुच्या दुकानांसह बिअरबार रेस्टॉरंट तसेच रात्री बे-रात्री उशीरा पर्यंत खानावळीच्या नावावर नावावर चालणारे धाबे परिसरातील रहिवाश्यांसह व्यापारी वर्ग तसेच जनसामान्यासाठी अक्षरशः डोकेदुखी निर्माण करीत असून शहरासह तालुक्यातील काही पडद्यामागील राजकीय दडपशहांनी विरोधकांवर दहशत निर्माण करण्यासाठी तसेच शहरात अराजकता माजवून फुकटात नायकाची भुमिका साकार करण्यासाठी जनुकाही तळीराम टेभ्यांची फौज उभी केली की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रथमतः 'तळीराम टेंभ्यांना' मद्य इंधराची रसद पुरवून अश्या तळीराम टेंभ्याना प्रज्वलीत करायचे आणि या तळीराम टेभ्यांचा भडका उडायची वेळ आली की मग विरोधक प्रतिष्ठित नागरिक पत्रकार यांच्या विरोधात या धगधगत्या तळीराम टेंभ्यांचा वापर करीत शहरात आगडोंब पसरवायचा असा हा कुटील डाव रचणाऱ्या पडद्यामागील राजकीय दडपशहांसह त्यांच्या इशाऱ्यावर शहरात धुमाकूळ घालणाऱ्या 'तळीराम टेंभ्याचा' देखील कायमचा विमोड करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पाऊल उचलायला हवी असे स्पष्ट मत सर्वसामान्य जनता व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.

💥शहरातील उच्चभ्रू वसाहतीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तळीराम टेभ्यांचा वेळोवेळी उपद्रव नागरिक त्रस्त :-


शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील लोकमान्य टिळकरोड,सोनार गल्ली,महाविर नगर,जुना मोंढा परिसर,बसस्थानक रोड,रेल्वे स्टेशन परिसर अश्या उच्चभ्रू वसाहतींमध्ये देशी दारू अड्डे,देशी-विदेशी दारू दुकान तसेच बिअरबार रेस्टॉरंट,खानावळीच्या नावावर चालणारे धाबे सर्वसामान्य जनता व्यापारी तसेच परिसरातील नागरीकांसाठी अक्षरशः धोकादायक झाली असून यथेच्छ दारू ढोसून तुल झालेले हे 'तळीराम टेंभे' परिसरासह शहरात सर्वत्र अफवा/अपप्रचार पसरवण्याचे काम....अल्पसंख्याकांक जाती समुदायातील लोकांवर हल्ले करण्याचे काम.....सामाजिक कार्यकर्ते पत्रकार/प्रतिष्ठित नागरिकांना धमक्या देण्याचे काम....सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालीत दहशत निर्माण करण्याचे काम....अर्वाच्च जातीयवादी शिविगाळ करीत सर्वसामान्य जनतेच्या धार्मिक जातीय भावना दुःखावण्याचे काम.....व्यवसायिकांना धमकावून दारू पिण्यासाठी पैशाची वसूली करण्याचे काम.....महिला/शाळकरी मुलींना पाहून अश्लिल भाषेचा वापर हातवारे करण्याचे काम....किरकोळ वादाला जातीय दंगलीचे स्वरुप देण्याचा प्रयत्न करण्याचे काम...व्यापारी प्रतिष्ठित नागरीकांच्या दुचाकी घालीत उलट त्यांच्याच अंगावर धावून जात जिवे मारण्याच्या धमक्यांसह दुकानांची तोडफोड करण्याचे काम राजरोसपणे करीत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाल्याचे पाहावयास मिळत असून अनेक व्यापारी शहरातून काढता पाय घेऊन आपली व्यापारी प्रतिष्ठाण इतरत्र हलवण्याच्या तयारीत आहेत संबंधित 'तळीराम टेंभ्यांचा' स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वापर करून घेणारे पडद्या मागील राजकीय दडपशहा त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची वेळ आली उघडपणे त्यांना वाचवण्यासाठी समोर येतात परंतु त्यांच्या दुष्कृत्या विरोधात मात्र सर्वसामान्य जनता प्रतिष्ठित नागरीकांना सहकार्य करण्यास मात्र धजावत नाहीत त्यामुळे आपण कितीही नग्न तांडव केला तरी आपल कोणीही काही वाकड करीत नाही हा त्यांच्या मनात झालेला भ्रम शहराच्या कायदा व सुव्यस्थेचा वेळोवेळी बळी घेत असल्याचे निदर्शनास येत आहे......
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या