💥गंगाखेड तालुक्यातील वृंदावन जवळा (रु ) येथे ज्ञानेश्वरी पारायण सांगता....!


💥यावेळी सकाळी ७ ते ८ यावेळी ज्ञानेश्वरी पारायण झाले नंतर ब्राह्मणांच्या हस्ते ज्ञानेश्वरीची पूजा करण्यात आली💥

गंगाखेड (दि.२९ आगष्ट) - वृंदावन जवळा रूमना ता. गंगाखेड जि. परभणी येथे  श्रावण मासानिमित्त अखंड चालू असलेल्या ज्ञानेश्वरी परायणाची सांगता (दि.२८)रविवार रोजी करण्यात आली. यावेळी सकाळी ७ ते ८ यावेळी ज्ञानेश्वरी पारायण झाले नंतर ब्राह्मणांच्या हस्ते ज्ञानेश्वरीची पूजा करण्यात आली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी च्या वेशात व संत तुकाराम महाराजांच्या वेशात असलेल्या बाल गोपाळांची भव्य अशी दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये  पुरुष, महिला शाळेतील विद्यार्थी गावातील नागरिक  सहभागी झाले होते. फुगडी खेळून, तसेच अभंग म्हणून आनंद घेतला. 

यानंतर बालगोपाळांचा गीतेचा पाठ घेण्यात आला. संगीत भजन काना लाहोटी यांनी गायले. " तसेच प प श्री श्री श्री १००८ महंत पद्मनाभानंद गिरी महाराज श्री तुळजाभवानी संस्थान राजगादी राजा टाकळी गोदावरी किनारा ता. घनसावंगी  जि.  जालना यांचे प्रवचन १२ ते १ या वेळेत झाले. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी या ओवी प्रमाने वृंदावन नगरी भक्तीच्या गजरात दुमदुमली होती. हा सुख सोहळा स्वर्गी नव्हे. असे वृंदावन वाशी यांना वाटत होते. प्रवचनानंतर संगीतमय आरती झाली. त्यानंतर मुख्याध्यापक श्री भडके सर व , गावकर्‍यांच्या वतीने  महाप्रसादाची व्यवस्था  करण्यात आली . हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या