💥राज्यातील २५ जिल्हा परिषद व २८४ पंचायत समिती अंतर्गत निवडणूक प्रक्रियेस राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती...!


💥राज्यातील जिल्हाधिकार्‍यांना आज शुक्रवार दि.०५ आगस्ट रोजी सायंकाळी पत्राद्वारे आदेश जारी केले आहे💥

मुंबई (दि.०५ आगस्ट) : राज्यातील २५ जिल्हा परिषद व २८४ पंचायत समिती अंतर्गत निवडणूक प्रक्रियेस राज्य निवडणूक आयोगाने आज शुक्रवार दि.०५ आगस्ट २०२२ रोजी सायंकाळी काढलेल्या एका आदेशाद्वारे स्थगिती बहाल केली आहे.

           राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी आज शुक्रवारी सायंकाळी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना पाठविलेल्या पत्राद्वारे २५ जिल्हा परिषद व २८४ पंचायत समिती अंतर्गत अंतीम आरक्षण अधिसूचनेसह अंतीम मतदार याद्या प्रसिध्द करण्याच्या प्रक्रियेस स्थगिती बहाल करण्यात आल्याची माहिती दिली. निवडणूक आयोगाचा पुढील आदेश येईपर्यंत या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही करु नये, असेही म्हटले.

           दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री मंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत वाढीव गट, गण निर्मितीसह आरक्षणाबाबत नव्याने काही निर्णय घेतले. विशेषतः जून्या पध्दतीनेच म्हणजे गट, गण संख्या व आरक्षणाबाबतचे धोरण अवलंबविले जाईल, असे स्पष्ट केले. त्या पार्श्‍वभूमीवरच राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी काढलेला आदेश निवडणूकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणारा आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या