💥हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील केलसूला येथील शंभर वर्षा पुर्वीचे वडाचे झाड कोसळले....!


💥साखरा ते कापडशिंगी रस्त्यावर वडाचे झाड कोसळल्याने हा राज्य रस्ता बंद💥

* शिवशंकर निरगुडे : हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील केलसूला येथील फुला जवळील वडाचे झाड कोसळल्याने साखरा ते कापडशिंगि राज्य रस्ता गेल्या तीन  तासा पासून बंद आहे हे वडाचे झाड कोसळल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडत आहे ह्या झाडाच्या खालून जातांना हिवरखेडा येथील शेतकरी मोटरसायकलवरून झाडा खालून जातांना बाल बाल वाचले 

सेनगाव तालुक्यातील केलसुला येथील कूमारेश्वर महादेव मंदिराच्या जवळ असलेल्या फुलाच्या काठावर आणि ओढ्यावर हें झाड होते हें झाड अंदाजे 100 वर्षा पुर्वीचे आहे असे येथील ग्रामस्थ सांगतात आज ते वडाचे  झाड ना वारा ना पाणी तरी पण अचानकपणे हें कोसळून पडले मात्र यात काही जीवित हाणी झाली नाही मात्र हें झाड गेल्या तीन  तासा पासून रस्त्यावर पडल्यामुळे साखरा ते कापडशिंगि राज्य रस्ता बंद झाला आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने हें झाड तात्काळ हटवून रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी प्रवाशाकडून केली जात आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या