💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कर्णबधिर विद्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा.....!


💥या कार्यक्रमात मूकबधिर विद्यार्थ्यांनी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने व युवा आघाडी जिल्हाप्रमुख चोपडेंना बांधल्या राख्या💥

परभणी (दि.१३ आगस्ट) - आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने एमआयडीसी परिसरात असलेल्या कांचन त्र्यंबकराव कत्रुवार कर्णबधिर विद्यालयातील विद्यार्थिनी सोबत रक्षा बंधनाचा उत्सव साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमात मूकबधिर विद्यार्थ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने व युवा आघाडी जिल्हाप्रमुख गजानन चोपडे यांना राख्या बांधल्या.

कार्यक्रमाला शाळेतील कर्मचारी मुख्याध्यापक अशोक व्यवहारे व प्रकाश जाधव, प्रकाश पेडगावकर, विलास रेवनवार,श्रीमती नलिमा साळूंके, एस.एस .साखरे, श्रीमती संगीता माने, कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या