💥परळी नगरपालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे तीव्र निदर्शने संपन्न.....!


💥यावेळी वंचित बहुजन आघाडीचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते💥                    

परळी (दि.१५ आगस्ट) - परळी नगरपालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने संपन्न झाले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील भिमानगर व नागसेन नगर येथील रहिवाशांना गेल्या अनेक दिवसापासून कुठल्याही प्रकारच्या नागरी सुविधा नसल्यामुळे उदाहरणात नाल्या रोड यामुळे तर येथील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्या मुळे येथील नागरिकांनी अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून व लेखी निवेदन देऊनही कुठल्याच प्रकारची कारवाई न झाल्यामुळे परळी शहर व तालुका वंचित युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे वंचित बहुजन युवा आघाडीचे दबंग जिल्हाध्यक्ष भगवंत आप्पा वायबसे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.०६ आगस्ट २०२२ रोजी परळी मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देऊन सदरील रोड व नाल्या १५ ऑगस्ट पर्यंत करण्यात याव्यात अन्यथा १५ ऑगस्ट रोजी एक दिवशीय धरणे आंदोलन भिमानगर येथील चिखलमय रस्त्यावर करण्यात येईल असे लेखी निवेदन दिले असताही कुठल्याच प्रकारची कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ आज सोमवार दि.१५ आगस्ट २०२२ रोजी  भिमानगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभागृहासमोरील चिखलमय रस्त्यावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे जिल्हा उपाध्यक्ष प्रसेनजित रोडे  वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळासाहेब किरवले युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेश सरवदे महासचिव ज्ञानेश्वर गीते उपाध्यक्ष अवि मुंडे विजय माणिक बनसोडे शहराध्यक्ष गफार भाई शहर महासचिव सचिन भाऊ रोडे शहर उपाध्यक्ष संदीप ताटे वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम प्रेम जगतकर वंचित बहुजन युवा आघाडीचे शहर महासचिव विनोद रोडे योगेश मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली तर या आंदोलनात धम्मा शिरसागर विजय जगताप विशाल कांबळे अमित शिरसाट गौतम कांबळे दगडू हावळे विलास कांबळे नामदेव पैठणी ललिता भागवत कांबळे शोभाताई मुंडे गवळण गायकवाड सुकेशनी कांबळे सुमन खंदारे आदेश भैया पैठणी शिलाबाई कांबळे संदीप नामदेव पैठणी राहुल शिरसाट माणिक जोगदंड दत्ता उजगरे गोपाळ कांबळे अमोल डुमणे राष्ट्रपाल काळे अजय रोडे अति शिरसाट अमित घाडगे मारुती कांबळे नागनाथ रायबोळे हरिभाऊ कांबळे करण कांबळे इत्यादी युवकांनी व महिलांनी सहभाग घेऊन सदरील आंदोलन यशस्वी केले असून लवकरात लवकर सदरील रोड दुरुस्त करण्यात यावा अन्यथा लवकरच परळी नगरपालिकेवर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ही प्रसिद्धी पत्रकार द्वारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या