💥कंत्राटी कामगारांचे प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवा असोसिएशनचे वीज अधिकाऱ्यांना निवेदन.....!


💥कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगाराची हमी द्यावी💥


शिकाऊ उमेदवार व कंत्राटी कामगारांचे तिन्ही कंपनी प्रशासन व राज्यशासनातर्फे आश्वासित प्रलंबित प्रश्न त्वरीत सोडविण्यात यावे, अशी मागणी तांत्रिक कामगार युनियन 5059 प्रणित तांत्रिक अप्रेंटीस कंत्राटी कामगार असोसिएशन नी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. महावितरण,महापारेषण,महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील कार्यकारी संचालक (मास)व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.


कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगाराची हमी द्यावी, महामारीच्या काळात कंत्राटी कामगारांनी केलेल्या कामांची दखल घेत त्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे, याकरीता विशेष भरती मोहीम राबवावी, कंत्राटी कामगाराकरीता कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात यावी. राज्यशासनाने आश्वासन देत शिकाऊ उमेदवारांना वाढीव 25 टक्के आरक्षण त्वरीत लागू करावे, कंत्राटी कामगारांना रोजंदारी पध्दतीवर घेण्यात यावे, शासन नियमाप्रमाणे महावितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरतीमध्ये वयोमर्यादावाढवावी. तिन्ही कंपन्यांमधील तृतिय व चतुर्थ श्रेणीतील रिक्तपदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया त्वरीत राबवावी, मराठा उमेदवारांना निवड यादीप्रमाणे त्वरीत विद्युत सहाय्यकपदी नियुक्ती द्यावी.भारतीय डाक विभागीय योजनेचा फायदा कंत्राटी कामगारांना कंपनीच्या वतीने द्यावा, कंत्राटी कामगार यांना नियमीत कामगारांप्रमाणे विमा संरक्षण कवच देण्यात यावे, कंत्राटी कामगारांचे निधन झाल्यास नियमीत कामगार प्रमाणे अंत विधी करता कंपनी वतीने आर्थिक मदत देण्यात यावी.  आदी मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहे. शिष्टमंडळात केंद्रिय उपाध्यक्ष बी.आर. पवार , केंद्रिय सरचिटणीस प्रभाकर लहाने, उपसरचिटणीस नितिन चव्हाण, राज्य सचिव आनंद जगताप , तांत्रिक कंत्राटी कामगार असोसिएशन  राज्यकार्याध्यक्ष विक्की कावळे, सातारा जिल्हाध्यक्ष दत्तात्रय धायगुडे आदी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या