💥परभणी शहरातील साने चौक ते धार रस्तावर टिप्परच्या धडकेत २० वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू...!


💥डॉ.झाकीर हुसेन महाविद्यालया समोर घडली अपघाताची घटना💥

परभणी (दि.३१ आगष्ट) : परभणी शहरातील साने चौक ते धार रस्ता या दरम्यान डॉ.झाकीर हुसेन महाविद्यालया समोर आज बुधवार दि.३१ आगष्ट २०२२ रोजी सकाळी ११-३० वाजेच्या सुमारास एका टिप्परने दिलेल्या धडकेत २० वर्षीय युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

           या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की आज बुधवारी ३१ आगष्ट रोजी सकाळी ११-३० वाजेच्या सुमारास ही भयंकर अपघाताची घटना घडली. साने चौकातून एम.एच.३८ के.०९० या क्रमांकाच्या दुचाकीवर मदीना नगर भागातील रहिवाशी सय्यद समीर सय्यद नसीर वय २० वर्षे हा कारागिर शटर बिल्डींगच्या कामाच्या निमित्ताने जात असतांना डॉ. झाकीर हुसेन महाविद्यालयासमोर समोरुन जाणार्‍या टिप्पर क्रमांक एम.एच.२२ एन.११५७ या सुसाट धावणाऱ्या  टिप्परने धडक दिली. त्यात सय्यद समीर सय्यद नसीर हे गंभीर जखमी झाले. होमगार्डच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेवून त्या युवकास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्या युवकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या प्रकरणात नानलपेठ पोलिसांनी टिप्परसह टिप्पर चालकास ताब्यात घेतले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या