💥परभणी तालुक्यातील सिंगणापूर येथील मारहाण प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू...!


💥जखमी युवकावर नांदेड येथील रुग्नालयात उपचार सुरू होते💥

परभणी (दि.19 आगस्ट) :  परभणी तालुक्यातील सिंगणापूर येथे दि.१३ आगस्ट २०२२ रोजी झालेल्या गंभीर मारहाण प्रकरणात जखमी झालेल्या युवकाचा नांदेड येथील रुग्नालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

         सविस्तर वृत्त असे की सिंगणापूर येथील गोविंद कांबळे नामक युवकास १३ ऑगस्ट २०२२ रोजी सहा आरोपीतांनी बेदम मारहाण केली होती या घटनेत तो युवक गंभीर जखमी झाला. नातेवाईकांनी त्यास तातडीने परभणीहून नांदेडला उपचारार्थ दाखल केले परंतु काल गुरुवार दि.१८ आगस्ट रोजी रात्री या युवकाचे उपचार सुरु असतांना निधन झाले. या युवकावर आज शुक्रवार दि.१९ आगस्ट २०२२ रोजी दुपारी सिंगणापूरात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी गावात मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला. परंतु, पोलिसांनी मध्यस्ती करीत, ठोस असे आश्‍वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी त्या युवकाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, बालाजी मोतीराम कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरु केला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या