💥पत्रकार जनार्दन अवरगंड यांच्यांवरील हल्ल्याचा ' इ रा ' तर्फे तिव्र निषेध....!


💥पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची जिल्हाध्यक्ष मदन कोल्हे यांची मागणी💥 

परभणी (दि.२६ आगस्ट) - ग्रामीण भागातील पत्रकार,जनार्दन बालासाहेब अवरगंड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा, इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन नविदिल्ली च्या परभणी जिल्हा शाखेतर्फे तिव्र निषेध व्यक्त केला असुन या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुर्णा तालुक्यातील माखणीसहीत पुर्ण ताडकळस सर्कलमध्ये शेतातील पिकांचे नुकसान झाले असून, ओला दुष्काळाची स्थिती निर्माण झाली असताना, शासनाला दिलेल्या अहवालात,माखणी गावच्या शेतीचा ओला दुष्काळी अहवाल निरंक पाठविल्याची माहिती,माखणी येथील वार्ताहर जनार्दन अवरगंड यांना समजल्या नंतर त्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये म्हणून माखणी चे सरपंच गोविंद हरीभाऊ अवरगंड यांना अतिवृष्टी चा अहवाल विचारला असता त्याचा राग मनात धरून सरपंच गोविंद अवरगंड व त्यांचा साथीदार महाजन बबनराव अवरगंड यांनी दि.२३ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजता मारोती मंदिरासमोर दै.सामना चे वार्ताहर जनार्दन बालासाहेब अवरगंड यांच्यावर शिवीगाळ करत जोरदार हल्ला केला व मारहाण करून कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिल्याने जनार्दन अवरगंड यांचे कुटुंबीय भयभीत झाले असून दहशतीचे सावटाखाली आहे.या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पत्रकार जनार्दन अवरगंड यांचे वर झालेल्या जिवघेण्या भ्याड हल्ल्याचा इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन तर्फे तिव्र निषेध करण्यात येत आहे ग्रामीण भागातील पत्रकारांना वार्तांकन करताना जिवाची बाजी लावून कामं करावे लागते, पत्रकार जनार्दन अवरगंड यांचे वर जिवघेणा हल्ला करणाऱ्या मारेकऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई केली जावी अशी मागणी इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन नविदिल्ली चे परभणी जिल्हा अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार मदन बापु कोल्हे यांनी केली असल्याचे ' इ रा ' चे परभणी जिल्हा मिडिया चिफ देवानंद वाकळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या