💥परभणी येथील महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालया मार्फत 'हर घर तिरंगा' अभियानाची जनजागृतीसाठी महारॅली संपन्न...!


💥राजगोपालचारी उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत बचत गटातील महिलांच्या महारॅलीचे करण्यात आले होते आयोजन💥 


परभणी (दि.११ आगस्ट) : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त येथील महिला आर्थिक विकास महामंडळ परभणी कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने माविममार्फत 'हर घर तिरंगा' अभियानाची जनजागृती करण्यासाठी आज राजगोपालचारी उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत बचत गटातील महिलांच्या महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी महापालिका आयुक्त देविदास पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार लोखंडे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी सुनिल हट्टेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे श्री.पत्की, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी झिंजाडे, सहा.जिल्हा समन्वय अधिकारी निता अंभोरे, प्रकाश दवणे, जयश्री टेहरे यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.


           श्रीमती आंचल गोयल जिल्हाधिकारी म्हणाल्या की, मविममार्फत अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मविमचे कार्य आणि कर्तुत्व कौतुकास्पद आहे स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव  हर घर तिरंगा घर घर तिरंगा दि 13 ते 15 या कालावधी मध्ये उभारण्या बाबत  करण्यात आले सर्व विभाग प्रामुख्याचे देखील  कार्यक्रमा प्रसंगी गोरवोद्गार काढले बचत गटच्या माध्यमातून तिरंगा रॅली एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलाची उपस्थिती हा एक अगळा वेगळा कार्यक्रम असल्याचेचे त्यांनी सांगितली.  यावेळी श्रीमती आंचाल गोयल यांनी राजगोपालाचारी उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय जाणीव जागृती पर तिरंगा महारॅली  मध्ये तिरंगा हातामध्ये घेऊन जाणीव जागृतीपर घोषणा समाज प्रबोधनापर  त्यांनी दिल्या. 


  

   आयुक्तदेवीदास पवार  म्हणाले की, बचत गटाच्या माध्यमातून महानगर पालिकेत विविध ठिकाणी तिरंगा विक्री केंद्र उभारुण जास्तीत जास्त नागरिका पर्यंत घरोघरी तिरंगा पोहचवावा.  बचत गटाच्या माध्यमातून परभणीमध्ये खूप मोठी चळवळ उभी राहिली आहे मविम च्या माध्यमातून महिला उत्तम प्रकारची कामगिरी पार पडत आहे महिला त्यातून खूप कर्तुत्वन  बनल्या आहेत त्यांनी देखील या रॅली मध्ये उत्सुर्त सहभाग नोदविला.


            लोकसंचलित साधन केंद्र व महिला स्वयं सहायता बचत गटाच्या माध्यमातून बचत गटातील सर्व कुंटुंबापर्यंत तिरंगा पोहोचवण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच लोकसंचलित साधन केंद्र, महिला ग्रामसंघ, शहर स्तर संघ, वस्ती स्तर संघ व निवडक बचत गटाच्या माध्यमातून विविध ठिकाणी तिरंगा ध्वज विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहेत. त्या माध्यमातून घरा-घरा पर्यंत तिरंगा पोहोचवण्यात येत आहे. यामाध्यमातून महिलांना रोजगार निर्मिती होत आहे. यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते उद्योजक महिलांचा सन्मान करण्यात आला.

  कार्यक्रमाची सुरवात हुतात्मा स्मारक राजगोपालचार्य उद्यान येथे हुतात्मा स्मारकास  पुष्पचक्र अर्पण करून करण्यात आले. तसेच रागोळीच्या च्या माध्यमातून भारत माता देखील सकारण्यात आली मान्यवरांच्या स्वागत  वृक्षाचे रोप  देऊन करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरानी मनोगत व्यक्त केली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या