💥राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिलीप धारूरकर यांना श्रद्धांजली....!


💥परखड पत्रकार आणि विचारवंत असे चतुरस्त्र व्यक्तिमत्व गमावले💥

मुंबई (दि.०१ आगस्ट) :- ज्येष्ठ पत्रकार, संपादक तथा राज्याचे माजी मुख्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांच्या निधनामुळे परखड पत्रकार आणि विचारवंत असे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारुरकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.

'अभ्यासू पत्रकार, संपादक म्हणून धारुरकर यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. स्तंभलेखक, उत्तम वक्ते म्हणून ते परिचित होते. राज्याचे माहिती मुख्य माहिती आयुक्त म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणून धारुरकर स्मरणात राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,'असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या