💥गंगाखेडचे रासपा आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्यावर पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलिन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल...!


💥शांतता समिती बैठकीत 'पोलिसांनी हप्ते घेणे बंद केले तर अवैध धंदे बंद होतील' असे वक्तव्य करणे पडले महागात💥

परभणी (दि.३१ आगष्ट) : जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रीय समाज पार्टीचे आमदार तथा रासपा प्रदेशाध्यक्ष डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी दि.२९ आगष्ट रोजी गंगाखेड येथील शांतता समितीच्या बैठकीत बोलतांना 'पोलिसांनी हप्ते घेणे बंद केले तर अवैध धंदे बंद होतील असे वक्तव्य केले होते यावेळी उपस्थित पोलिस अधिकारी व आ.गुट्टे यांच्यात शाब्दिक चकमक देखील झाली यावेळी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी आपण पुरावे द्या आम्ही कारवाई करतो असे देखील म्हटले होते.

पोलिस प्रशासना विरोधात कुठलाही पुरावा नसतांना बेजवाबदारपणे केलेले वक्तव्य आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांना चांगलेच महागात पडले असुन पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलीन केल्या प्रकरणी त्यांच्यावर गंगाखेड पोलिस स्थानकित गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटने संदर्भात बोलतांना आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी असे म्हटले आहे की जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री.जयंत मिना यांनी आपल्यावर जाणीवपूर्वक या घटनेच्या तब्बल ३६ तासानंतर गुन्हा दाखल केला आहे जिल्ह्याचे कर्तव्यकठोर आयपीएस अधिकारी सहाय्यक पोलिस अधीक्षक श्रेणीक लोढा यांनी देखील आ.डॉ.गुट्टे यांना पुरावे द्या आताच कारवाई करतो असे बजावले होते.परंतु आ.डॉ.गुट्टे पुरावा देण्यास असमर्थ ठरले या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला होता.

हा प्रकार घडल्यानंतर पोलीस दलामधील अधिकारी, अंमलदार यांच्यामध्ये उद्देशपूर्वक अविश्वासाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने हे वक्तव्य करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच, पोलीस दलातील व्यक्तींना त्रास होईल आणि जनतेमध्ये पोलीस दलाची प्रतिमा मालिन झाली आहे. याप्रकणी आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा आमदार गुट्टे आणि पोलीस प्रशासनातील संघर्ष वाढणार असल्याचे दिसून येत आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या