💥परभणी मनपा आयुक्तांनी ठरवले आहे वाटते की यंदाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धुळीत साजरा करायचा ?💥मनपा हद्दीत मुख्य रस्ते वसाहती मधील अंतर्गत  रस्त्याची चाळणं झाल्याने ठिक ठिकाणी खडेच खड्डे💥

परभणी :- सम्पूर्ण भारतभर मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा केला जात आहे तसेच परभणी जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद ग्रामपंचायत यांचे द्वारा विविध उपक्रम राबवून उत्सव साजरा केला जात आहे मनपा मागे कशी राहील त्यांनी यंदा ठरवले आहे धूळी मध्ये अमृत महोत्सव साजरा करायचा असे म्हणण्याची वेळ आली आहे 15 ऑगस्ट जवळ येत आहे. 

पण परभणीत मात्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे परभणी मनपा हद्दीत मुख्य रस्ते वसाहती मधील अंतर्गत  रस्त्याची चाळणं झाल्याने ठीक ठिकाणी खडेच खड्डे झाले आहे वरून ह्यात खड्डे बुजवणे करिता मुरूम व खडी कच वापरली गेली त्यामुळे पाऊस बंद झाला की कोरडे वातावरण मध्ये शहर भर धूळीचे लोट उठत आहे मनपा द्वारे स्वछता केली जात नसल्याने नागरिकांना वाहन चालवताना तर त्रास होतच आहे पायी चालणारे नागरिकांचे तर हाल विचारायचे कामच उरले नाही अंगावर धुळच धूळ सर्वत्र पाहायला मिळत आहे नेहमी प्रमाणे परभणी आयुक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांच्या मनात असा प्रश्न निर्माण होत आहे की परभणी मनपा आयुक्तांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धुळी मध्ये साजरा करायचा आहे की काय पाहूया मनपा आयुक्त स्वछता कामी काही ठोस पाऊले उचलतील का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या