💥महसूल दिनी उद्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने ज्ञानोबा माऊली मुंडे यांचा होणार सत्कार...!


💥बिडचे जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांच्या हस्ते उद्या आदर्श पोलीस पाटील पुरस्कार देऊन करण्यात येणार सन्मानित💥

परळी ( प्रतिनिधी)

   परळी तालुक्यातील पांगरी, गोपीनाथ गड गावचे पोलीस पाटील ज्ञानोबा माऊली मुंडे यांचा उद्या बीडचे जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांच्या हस्ते आदर्श पोलीस पाटील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

      उद्या दिनांक पाच ऑगस्ट रोजी बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महसूल दिनाचा सकाळी 11 वाजता कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात महसूल चे विविध पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थित वितरित करण्यात येणार आहेत. यावर्षी बीड जिल्ह्यातून केवळ एकमेव पोलीस पाटील म्हणून  ज्ञानोबा माऊली मुंडे यांचा आदर्श पोलीस पाटील म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.   पांगरी गोपीनाथगड  या गावच्या पोलीस पाटील पदाचा कार्यभार ज्ञानोबा माऊली मुंडे यांनी 2001 मध्ये आपल्या हाती घेतला. त्यानंतर त्यांनी 2004 मध्ये बीड जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष झाल्यानंतर परळीला भव्य असा मेळावा घेतला. 2006 मध्ये पोलीस पाटलांसाठी विशेष असे कायदेशीर शिबिर आयोजित केले. पांगरी गोपीनाथ गड या गावांमध्ये गाव तंटामुक्त करण्यासाठी तसेच गावात कायम शांतता राहील यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यामुळे सण उत्सव अधिक कार्यक्रमांमध्ये नेहमीच गावात शांततेच कार्यक्रम पार पडले. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच 2015 मध्ये बीडचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी राज्यपाल पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.

     20२१ मध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून पोलीस पाटलांच्या भरती बाबत प्रत्यक्ष निवेदन दिले. तसेच राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री आमदार धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेते असताना विधान परिषदेत पोलीस पाटलांच्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला होता. यासाठी ज्ञानोबा माऊली मुंडे यांनी पाठपुरावा केला होता. मागील दोन वर्षात कोरोनाच्या काळामध्ये गोपीनाथ गड पांगरी कोरोना मुक्त राहावा यासाठी त्यांनी विशेष असे प्रयत्न केले. याची दखल महसूल प्रशासनाने घेऊन त्यांची आदर्श पोलीस पाटील पुरस्कारासाठी निवड केली आहे. हा पुरस्कार उद्या जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या