💥परभणी येथील श्री.शिवाजी महाराज महाविद्यालयात सांस्कृतिक वार्तापत्र आयोजित ‘फाळणीच्या वेदना’ विशेषांकाचे प्रकाशन...!


💥या विशेषांकाचे येत्या रविवारी दि. 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता होणार प्रकाशन💥

परभणी (दि.25 आगस्ट) : सांस्कृतिक वार्तापत्र आयोजित ‘फाळणीच्या वेदना : एक विस्मृत नरसंहार’ या विशेषांकाचे येत्या रविवारी दि. 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता परभणीत प्रकाशन होणार आहे.

          या निमित्त सांस्कृतिक वार्तापत्र यांच्यातर्फे डीआरबीओचे शास्त्रज्ञ काशीनाथराव देवधर यांचे व्याख्यान श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास अ‍ॅड. राजेंद्र सराफ हे अध्यक्षस्थानी तर आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. केदार खटींग या विशेषांकाचे अतिथी संपादक योगेश्‍वर कस्तूरे, सांस्कृतिक वार्तापत्रच्या व्यवस्थापिका सुनीता पेंढारकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती संस्कृती जागरण मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीरंग गोडबोले, कार्यवाह शिरीश पदे व सांस्कृतिक वार्तापत्रचे संपादक डॉ. मिलींद शेटे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या