💥परभणी येथे भारतीय किसान संघाची बैठक संपन्न....!


💥भारतीय किसान संघाचे कैलासजी धाकड यांची प्रमुख उपस्थिती💥 

परभणी (दि.२३ आगस्ट) - भारतीय किसान संघाचे कैलासजी धाकड आखिल भारतीय कार्यकारीणी सदस्य तथा महाराष्ट्र प्रांत पालक व दादा लाड संघटन मंत्री महाराष्ट्र व गोवा तथा अखील भारतीय अमंत्रीत सदस्य [ राजस्थान प्रदेश ] यांचे उपस्थितीत परभणी जिल्हा व तालुका कार्यकारणीची नियोजीत बैठक संपन्न झाली . या बैठकिसाठी परभणी जिल्ह्यातील २५ कार्यकर्ते उपस्थित होते ही बैठक तीन सत्रात संपन्न झाली.

या बैठकी दरम्यान भारतीय किसान संघाचे जिल्हास्थरावर रचनात्मक व संघर्षात्मक कार्य प्रभावीपणे नियोजन असावे याबाबतीत मा. कैलासजीनी सखोल मार्गदर्शन  कार्यकर्त्यांना करण्यात आले. तसेच ग्रामपातळीवर सक्षम ग्रामसमीती निर्माण करूण समृद्ध किसान व समृद्ध ग्रामची मा . दतोपंतजी ठेंगडी यांची संकल्पना पुर्णत्वास नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी किसान संघाचे कार्यात तण मन धणाने कार्य कसे केले पाहीजे असे अनेक विषयांची मांडणी करून ग्रामसमीतीचा सक्षम कार्यकर्ता कसा निर्माण करता येईल हे धेय डोळ्यासमोर ठेऊन स्वताला या देवकार्यात समर्पीत करून घ्यावे असे सुचविण्यात आले. तसेच बैठकिचे अंतम सत्र मौजे धसाडी ता. परभणी येथील ग्रामसभेने संपन्न झाले. मौजे धसाडी येथे मा. दादा लाड यांनी शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी शेतकरी संघटीत झाल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही यावर ग्रामीन कार्यकर्त्यांनी विचार करावा असे नमुद केले. तसेच मा. कैलासजीनी धसाडी व अंगलगाव येथील उपस्थित कार्यकर्त्यांनी महात्मा गांधीजींचे ग्रामसमृद्धीचे स्वपन्न पुर्ण करण्यासाठी तरुणांनी भारतीय किसान संघासी जोडून घेऊन आपला व स्वतःचे गावच्या विकासाठी दररोज १ तास वेळ दिल्यास गावचा विकास करण्यासाठी कोणाही समोर नतमस्तक होण्याची वेळ येणार नाही असे सुचविण्यात आले शेवटी सामुहीक पसायदान घेऊन बैठकीचे समापन करण्यात आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या