💥जिंतूर तालुक्यातील चारठाणा जवळील ढगे बुवा येथे यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी....!


💥श्री क्षेत्र ढगे बुवा येथे मागील अनेक वर्षापासून बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भव्य यात्रा भरते💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील चारठाणा जवळील परिसरातील श्री क्षेत्र ढगे बुवा येथे आज शनिवारी यात्रेनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केल्याची पहावयास मिळाले.

जिंतूर तालुक्यातील श्री क्षेत्र ढगे बुवा येथे मागील अनेक वर्षापासून बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भव्य यात्रा भरते. ढगे बुवा हा  देव बैल व इतर जनावरांचा तारणहारता असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी भव्य यात्रा भरते. परिसरातील शेतकरी आपापल्या बैलांना  घेऊन या ठिकाणी येत असतात. 

या ठिकाणी वाजत गाजत बैलांची मिरवणूक काढली जाते. तसेच विविध प्रसाद व खेळण्याची दुकाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात. श्री क्षेत्र ढगे बुवा येथे आज यात्रेनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली असल्याचे पहावयास मिळाले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या