💥अखंड हिंदुस्थान दिनी चिखली येथे जिल्हास्तरिय दिपोत्सवाचे आयोजन....!


💥दिपोत्सवात सहभागी होण्याचे डाॅ अर्चना आंबेकर यांचे आवाहन💥

चिखली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त दी.१४ ऑगस्ट रोजी  अखंड हिंदुस्थान दीनाचे औचित्य साधून सामूहिक देशभक्तीपर गीत व दीपोत्सवाचे चिखली शहरात आयोजन करण्यात आले असून आदर्श जीवन मित्र मंडळ व इतर आठ संस्थांच्या सयुक्त विद्यमाने मौनीबाबा संस्थान येथे सायंकाळी सात वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे.

 या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  अरविंद असोलकर तालुका संघ चालक रा.स्व.संघ चिखली,प्रमुख अतिथी म्हणून चित्तरंजन राठी विभाग संघ चालक रा.स्व.संघ,आ.संजय कुटे माजी कामगार कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य,प्रमुख उपस्थिती आमदार श्वेता महाले तसेच प्रमुख वक्ते म्हणून रामेश्वर कुटे विदर्भ प्रांत सह मंत्री विद्द्या भारती हे राहणार आहेत.या अनोख्या कार्यक्रमाला  उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाच्या मुख्य संयोजक प्रा.डॉ. अर्चना आंबेकर- संस्थापक अध्यक्ष आदर्श जीवन मित्र मंडळ बुलढाणा यांनी केले आहे.  जिल्ह्यातील समस्त वारकरी बंधू भगिनी , महिला मंडळ मातृवर्ग व समस्त युवा वर्ग आणि शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी वर्गाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अखंड हिंदुस्तान दिन स्मरण करण्यासाठी दीपोत्सवाचे सहकारी बनावे आणि मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आपली उपस्थिती द्यावी असे आवाहन केले आहे. या आवाहनासोबत श्री संत गजानन महाराज भक्त मंडळ चिखली, श्री गजानन महाराज सेवा समिती चिखली,इंडियन मेडिकल असोसिएशन चिखली, हार्ट फुलनेस सेंटर बुलढाणा जिल्हा,समर्थ भारत केंद्र,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP),संस्कार भारती,शाखा जिल्हा बुलढाणा विद्या भारती जिल्हा बुलढाणा शाखा;  यांच्या वतीने आमंत्रित करण्यात आले आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या