💥जिंतूर महावितरणचा अजब कारभार : चूक एकाची तर शिक्षा निरापराधाला.....!

 💥विज कर्मचाऱ्यांचे महावितरण कार्यालयासमोर कामबंद आंदोलन💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी. रामपूरकर

महावितरणच्या जिंतूर उपविभाग अंतर्गत येणाऱ्या  जिंतूर शहर शाखेतील वीज कर्मचारी जीवन मुरशटवाड यांच्यावर अन्यायकारक आणि चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी या मागणीसाठी आज बुधवारी विज कर्मचाऱ्यांनी जिंतूर शहरातील महावितरण कार्यालयासमोर काम बंद आंदोलन केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर शहरातील जालना रोड परिसरातील एका वीज ग्राहकाने अनाधिकृतरित्या  विज जोडणी केल्याप्रकरणी, वरिष्ठ तंत्रज्ञ जीवन मुरशटवाड यांना जबाबदार धरत त्यांच्यावर औरंगाबाद येथील पथकाने निलंबनाची कारवाई केली. 

परंतु प्रत्यक्षात ज्या विज ग्राहकाने अनाधिकृत वापर केल्याचे आढळले त्या ग्राहकास व शहर शाखेच्या एका निलंबित कर्मचाऱ्यांनी विज जोडणी केल्याचे निवेदनात म्हटले आहे त्या कर्मचाऱ्यावर कुठलीही कारवाई न करता मुरशडवाड यांची संबंधित भागासाठी नियुक्ती नसतानाही त्यांना जबाबदार धरून निलंबित करण्यात आल्याने सदर कारवाई अन्यायकारक असून, त्यांचे निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे, यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी शहरातील महावितरण कार्यालयासमोर कामबंद  आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. याबाबत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना लेखी निवेदन देण्यात आले या निवेदनावर, तालुक्यातील अनेक वीज कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या