💥भारताच्या स्वातत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून भारताच्या स्वातंत्र्यदिनी जनस्वराज्य फाऊंडेशनकडून वृक्षारोपण....!


💥झाडे फक्त लावू नका तर ती लावलेली झाड जगवा : जनस्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष रामराजे भोसले यांचे आवाहन💥

भारताच्या स्वातत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून भारताच्या स्वातंत्र्यदिनी जनस्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष रामराजे भोसले यांच्या संकल्पनेतून सुहागन गावात वृक्षारोपण करण्यात आले. बॉटल पामचे एकूण ४० झाडे गावातील मंदीराचा परिसर व मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले.

 गेल्या वर्षीही जनस्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने गावात ब्लॅक फायटस वृक्षाची लागवड करण्यात आली होती. या वर्षीही जनस्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने गावात वृक्षारोपण करून प्रत्येक झाडाला जाळीचे कुंपण करण्यात आले आहे. जेव्हढी झाडे लावली गेलीत ती सर्व टिकली पाहिजेत याकरिता खोल खड्डे करून गाळाची माती टाकून व झाडाला जाळीचे कुंपण करून झाडाची काळजी घेतली आहे. येत्या काही वर्षात गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन केले जाईल, असे जनस्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री रामराजे भोसले यांनी सांगितले. वृक्षारोपणाचे उद्घाटन ह.भ.प. श्री नारायण महाराज टाकळीकर व ह.भ.प. सटवाजी महाराज सुहागकर यांच्या हस्ते केले तर श्री हिराजी भोसले सर (माजी मुख्याध्यापक), श्री प्रभाकर भोसले सर (माजी केंद्र प्रमुख) , गावातील जेष्ठ नागरिक श्री बळीरामजी भोसले व श्री दाजीबा भोसले, श्री ज्ञानेश्वर भोसले (पी.एस.आय.), श्री दौलत भोसले (तालूका अध्यक्ष पत्रकार संघ) तसेच जि.प. शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या हस्ते झाडे लावण्यात आले. वृक्षारोपण करताना खड्डे खोदण्यासाठी श्री सुंदर भोसले यांनी सहकार्याच्या भावनेतून विनामुल्य ब्रेकरच्या सहाय्याने रस्ता खोदून दिला. वृक्षारोपणात श्री ज्ञानेश्वर भोसले ग्रा.प. सदस्य यांनी पुढाकार घेतला. तसेच सुंदर भोसले, पुरभाजी लिंबाजी भोसले, भुजंग भोसले, गजानन दिगंबर भोसले, सोनाजी भोसले, बापुराव भोसले, सुरेश भोसले, नारायन भोसले, मानेजी भोसले, आनंद बुचाले, संदीप भोसले, सटवाजी भोसले, सुभाष भोसले, रामचंद्र, पुरभाजी एकनाथ भोसले. गजानान भोसले,योगेश भोसले, नामदेव भोसले, बालाजी भोसले, आंबादास भोसले, आत्माराम वाघमारे, बालाजी वाघमारे, संतोष वाघमारे यांनी सहकार्य केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या