💥पुर्णा ताडकळस येथील मुस्लीम बांधवांच्या वतीने तेलंगणा येथील आमदार टि.राजा सिंग यांचा निषेध...!


💥आ.टि.राजा सिंग यांच्यावर कठोर कारवाईची मुस्लीम बांधवांनी केली मागणी💥

पुर्णा (दि.२६ आगष्ट) - तालुक्यातील ताडकळस येथील मुस्लीम बांधवांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी अपशब्द वापरणाऱ्या तेलंगणा येथील आमदार टि.राजा सिंग यांचा तिव्र शब्दात निषेध करीत ताडकळस पोलीस स्थानकात एकत्रित येवून येथे आमदार टि.राजा सिंग यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी निवेदन दिले.

सविस्तर बातमी अशी तेलंगाना येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार टी राजा सिंग हे एक संविधानिक पदावर लोकप्रतिनिधी असताना सुद्धा त्यांनी प्रॉफिट मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी अपशब्द वापरून सर्व मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावले आहेत म्हणून ताडकळस येथील सर्व मुस्लिम बांधवांनी तीव्र निषेध करत आमदार टी राजा सिंग यांना आमदार पदावरून निलंबित करण्यात यावे व  यांच्यावर कठोर कारवाई व्हावी जेणेकरून यापुढे कोणीही कोणत्याही धर्माच्या भावना दुखवू नये निवेदनावर फिरोज पठाण, शेख गुलाब, मोहसीन कुरेशी, शेख अझरुद्दीन, सलमान पठाण, सोहेल शेख, अरबाज पठाण, सय्यद खाजा, शमीम पठाण, शेख वाजिद, शेख तय्यब, हाफिस फय्याज, शेख इलियास, सय्यद ताहेर रहीम पठाण नसीर पठाण आदींसह अनेक मुस्लिम बांधवांच्या स्वाक्षरी आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या