💥पुर्णेत श्री.गणपती बाप्पांच्या आगमनाचा सर्वत्र जल्लोश : महिला अबाल वृध्दांसह तरुणांमध्ये उत्साह...!


💥गणेश महोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलिस प्रशासनही झाले सज्ज💥


पुर्णा : शहरासह तालुक्यात आज बुधवार दि.३१ आगष्ट २०२२ रोजी विघ्नहर्ता श्री गणेशाच्या आगमनाचा सर्वत्र जल्लोश पाहावयास मिळाला गणेश भक्तांनी ढोल ताश्यांसह टाळ मृदंगाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूका काढून श्री गणेशाची स्थापणा केली.विघ्नहर्ता श्री गणेशाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहरासह तालुक्यातील विविध गणेश मंडळातील पदाधिकारी/कार्यकर्त्यांसह गणेश भक्त सुसज्ज झाल्याचे पाहावयास मिळाले असून शहरासह तालुक्यातील विविध श्री गणेश मंडळांनी अत्यंत उत्कृष्ट अशी सजावट करून श्री.गणेशाची प्राणप्रतिष्टा केल्याचे निदर्शनास येत आहे.

श्री गणेश महोत्सवाला आज पासून सुरूवात झाल्यामुळे गणेश उत्सव शांततेत व उत्साहपुर्ण वातावरणात पार पडावा याकरिता पोलिस प्रशासन देखील सज्ज झाले असून याकरिता पुर्णा पोलिस स्थानकाचे पो.नि.मारकड हे स्वतः सर्वत्र फिरून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत असून शहरातील प्रत्येक गणेश मंडळांना भेटी देऊन गणेश मंडळांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश देत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलिस प्रशासनाकडून सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे दिसत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या