💥पुर्णा शहरासह तालुक्यात गणेशोत्सव व गौरी पुजन या काळात लोडसेडींग बंद करा....!


💥महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निवेदनाद्वारे मागणी💥

पुर्णा (दि.३१ आगष्ट) - पुर्णा शहरासह तालुक्यातील सर्व गावात सध्या सर्वत्र गणेश उत्सव व नंतर गौरी पूजन सण अतिशय उत्साहात साजरे करण्यात येतात या काळात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने लोडसेटिंग बंद करावी अन्यथा महाराष्ट्र नवनर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची जबाबदारी प्रशासनाची राहील अशी मागणी कनिष्ठ अभियंता श्री खरपे साहेब यांच्याकडे लेखी निवेनाद्वारे केली आहे यावेळी तालुका अध्यक्ष अनिल बूचाले पाटील शहराध्यक्ष गोविंद राज ठाकर गजानन भोसले, योगेश भोसले,खुशाल भोसले ,सुग्रीव पवार ,युवराज भोसले ,गजानन शिंदे , सोपान भोसले इंदर्जित भोसले ,माणिक भोसले श्रीकांत भोसले आदी तरुण कार्यकर्त्या उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या