💥महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 8 ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्हा दौरा....!


💥सोमवार दि. 8 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 2.00 वाजता नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण💥

हिंगोली (दि.05 आगस्ट) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दि. 8 ऑगस्ट, 2022 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.


सोमवार, दि. 8 ऑगस्ट, 2022 रोजी दुपारी 2.00 वाजता नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 2.45 ते 3.00 वाजता साई सृष्टी बंगला, साईनगर, कळमनुरी जि.हिंगोली येथे वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थिती . दुपारी 3.00 ते 3.45 वाजता अग्रसेन चौक, नांदेड नाका, हिंगोली येथे भव्य कावड यात्रेस उपस्थिती. 3.45 ते 5.00  वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे राखीव . सांय. 5.00 वाजता गांधी चौक, हिंगोली येथे शिवसेना पक्षाची जाहीर सभा. सांय. 6.00 ते 7.00 वाजता सावरखेडा, हिंगोली येथे आमदार संतोष बांगर यांच्या फार्म हाऊसचे उद्घाटन. सांय. 7.00 वाजता हिंगोली येथून नांदेड विमानतळाकडे मोटारीने प्रयाण.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या