💥जिंतूर येथे तोष्णीवाल ट्रस्टच्या शिबीरात 228 रुग्णांची आरोग्य तपासणी....!


💥या शिबिराच्या अध्यक्षस्थानी विधीज्ञ अ‍ॅड.मनोज सारडा हे होते💥

जिंतूर प्रतिनिधी  / बि.डी.रामपूरकर  

स्व.गिरधारीलालजी तोष्णीवाल यांच्या नवव्या पुण्य स्मरणानिमित्त स्व. आयोध्याबाई रामनारायण तोष्णीवाल चॅरिटेबल ट्रस्ट व उदयगिरी लॉन्स नेत्र रुग्णालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गजानन महाराज मंदिरात मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या शिबिरात 228 रुग्णांची तपासणी करण्यात आली.

           16 ऑगस्ट रोजी झालेल्या या शिबिराच्या अध्यक्षस्थानी विधीज्ञ अ‍ॅड. मनोज सारडा तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार, संदीप महाराज शर्मा, डॉ. महावीर पवार  डॉ.खान (उदगीर) पत्रकार राजाभाऊ नगरकर, विजय चोरडिया, शेख शकील, शहजाद पठाण, ब्रिजगोपालजी तोष्णीवाल उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांनी केले. या मोतीबिंदू तपासणी शिबिरात तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातून आलेल्या 228 रुग्णांची मोफत मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. मोतीबिंदू झालेल्या रुग्णांवर उदयगिरी लॉन्स नेत्र रुग्णालय उदगीर येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार असून या शिबिरात अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवला.

           कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमण तोष्णीवाल, पवन तोष्णीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन घुगे, दिनकर मस्के, राहुल घुगे, ज्ञानेश्‍वर गरड, दीपक दावलबाजे, खापरे, संजय साबळे, ज्ञानदेव कुदळे, प्रकाश खोलगडे, पी. डी. राठोड, विनोद पाचपीले यांनी प्रयत्न केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या