💥परभणी जिल्ह्यात आज बुधवार दि.17 ऑगस्ट रोजी अकरा वाजता सर्वत्र ‘समुह राष्ट्रगीत गायन’....!


💥नागरिकांनी समुह राष्ट्रगीत गायन' उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे💥

परभणी (दि.17 ऑगस्ट) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सवातंर्गत ‘समूह राष्ट्रगीत गायन’ हा उपक्रम जिल्ह्यात बुधवार दि. 17 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 11-00 वाजता राबविण्यात येणार असून या उपक्रमांत शाळा, महाविद्यालय, संस्था, नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रसासनाने केले आहे.

 या उपक्रमातंर्गत 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीत गायन अपेक्षित आहे. राष्ट्रगीत गायनासाठी जिल्हास्तर,तालुकास्तर, ग्रामस्तरावरील सर्व खाजगी, शासकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठामधील विद्यार्थी, शिक्षक, खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालय, केंद्र व राज्य शासनांचे संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, राजकीय पदाधिकारी यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.अन्य कोणी असेल त्या ठिकाणी थांबून राष्ट्र गिता सहभाग नोंदवावा तसेच समूह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी जाणते-अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये याची दक्षता घ्यावी.असे प्रसासनानेम्हटले.

राष्ट्रगीत गायनासाठी विद्यार्थ्यांनी मोकळे पटांगण, वर्ग खोली, किंवा हॉल या ठिकाणी एकत्रित उपस्थित राहावे. ग्रामस्तरावर, वार्ड स्तरावर, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीतील सर्व प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमांत सक्रीय सहभागी व्हावे असे आवाहन प्रसासनाने यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या