💥'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव'निमित्त 'स्वराज्य सप्ताह' अंतर्गत 17 ऑगस्ट रोजी सामुहिक राष्ट्रगानाचे आयोजन....!


💥समूह राष्ट्रगीत गायन हा उपक्रम शासनाच्या विभागांना बंधनकारक करण्यात आला आहे💥

परभणी (दि.15 आगस्ट) : राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव'निमित्त 'स्वराज्य सप्ताह' अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाबाबतचा निर्णय घेतला आहे. 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात 'स्वराज्य सप्ताह' अंतर्गत विविध कार्यक्रम, उपक्रम राबविले जात आहे. समूह राष्ट्रगीत गायन हा उपक्रम शासनाच्या विभागांना बंधनकारक करण्यात आला आहे. भारत देशाच्या  स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्षाचा समारोप 17 ऑगस्ट रोजी होणार असून यानिमित्त सकाळी 11 वाजता राज्यभर एक मिनिटांसाठी स्तब्धता पालन करण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व नागरिक एक मिनिटांसाठी जेथे असतील तेथेच थांबून सामूहिक राष्ट्रगीत गायनात सहभागी होतील. या राष्ट्रगीत गायनासाठी शाळा-महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. सकाळी 11 वाजता सुरू होऊन 11 वाजून 1 मिनिटांत राष्ट्रगान गायन करणे अपेक्षित आहे. समूह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी जाणते-अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. राज्यात एकाच वेळी समूह राष्ट्रगीत गायन होत असल्याने जिल्ह्यातील शालेय-महाविद्यायीन विद्यार्थी, नागरिक, अधिकारी-कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्थांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या